कृषी विद्यापीठ अभियंता यांनी मुळा धरणात टाकलेला हजारो ब्रास मुरूम काढून घ्यावा ,अन्यथा १५ ऑगस्ट रोजी मुळा धरणावर सचिन पवार यांचा उपोषणाचा इशारा .

कृषी विद्यापीठ अभियंता यांनी मुळा धरणात टाकलेला हजारो ब्रास मुरूम काढून घ्यावा ,अन्यथा १५ ऑगस्ट रोजी मुळा धरणावर सचिन पवार यांचा उपोषणाचा इशारा .

राहुरी कृषी विद्यापीठ अभियंत्यांनी मुळा धरणात टाकलेला बेकायदेशीर मुरुम काढुन घ्यावा अन्यथा १५ ऑगस्टला मुळा धरणावर उपोषण करणार - सचिन पवार यांचा इशारा .

 

             राहुरी कृषी विद्यापीठाने मुळाधराणातुन पाणी उपसा करणे कामी जाकवेलचे काम केले आहे या जाकवेल कडे जाण्या करीता अप्रोच ब्रिज करण्यासाठी निवीदा काढत एका ठेकेदाराल हे काम दिले होते मात्र सदरचा अप्रोच ब्रिज न बांधता विद्यापीठ शिवारातील इ विभागाच्या प्रक्षेत्रातुन बेकायदा मुरूम उत्खनन करून मुळा धरणात सुमारे ३००० ते ३५०० इतका मुरूम जलसंपदा विभागाची कोणतीही परवाणगी न घेता मुळा धरणात टाकला म्हणुन सचिन पवार यांनी मा कार्यकारी अभियंता मुळा पाट बंधारे विभाग अहमदनगर याचेकडे २४/११/२०२२ रोजी ताक्रार अर्ज दाखल केला होता परतु कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी कोणतीही दखल घेतली नाही या बेकायदेशीर मुरूम टाकले प्रकरणात पत्रकार सचिन पवार यानी वेळोवेळी पाठपुरवा केला म्हणुन उप अभियंता मुळा पाटबंधारें उपविभाग राहुरी व कार्यकारी अभियंता मुळा पाटबंधारे विभाग अहमनगर यांनी राहुरी कृषी विद्यापीठ अभियंता यांना सदर मुरूम काढुन घेण्याबाबत वेळोवळी पत्र दिले व सदर झाले पत्रव्यावहाराच्या प्रती सचिन पवार यांना देण्यात आल्या मात्र काही रजि. पोस्टाचे पाकीटांमध्ये अक्षरशः कोरे कागद पाठवले तर काही पोष्टपाकीटामध्ये त्याच त्याच जावक क्रमांकाचे व त्याच त्याच मजकुरांचे पत्र पाठवून गाजराची पुंगी वाजवत समाधान करण्याचे काम केले तसेच राहुरी कृषी विद्यापीठ अभियंता यांनी कार्यकारी अभियंता मुळा पाटबंधारे विभाग अहमदनगर आणी उपअभियंता मुळा पारबधारे उपविभाग राहुरी यांच्या पत्राला कोनतेही उत्तर न देता अक्षरक्षः केराची टोपली दाखवली .

 

     

            पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी विद्यापीठ अभियंता मिलींद ढोके यांचेविरुद्ध केवळ पत्र देण्या व्यतीरिक्त कोनतीही ठोस कारवाई केली नाही म्हणुन श्री पवार यांनी मा .मुख्य अभियंता जलसंपदा विभाग नाशिक यांचेकडे संदर्भीय तक्रार करून सदर प्रकरणाची चौकशीची मागणी केली .मुख्यअभियंता यांनी सदर तक्रारीची दखल घेत त्यांची कनिष्ठ कार्यालये कार्यकारी अभियंता मुळा पाटबंधारे विभाग अहमदनगार व उपअभियंता मुळा पाटबंधारे उपविभाग राहुरी यांना सदर प्रकरणी विद्यापीठ अभियंत्यांवर सिंचन कायद्या नुसार तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले परंतु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी विद्यापीठाच्या संबंधित अभियंत्या विरुद्ध कोणतिही कारवाई न करता मा .मुख्य अभियंता जलसंपदा विभाग नाशिक यांचे आदेश धुडकावन लावले आहेत म्हणून सचिन पवार यांनी मुख्य अभियंता जलसंपदा विभाग नाशीक यांचेकडे पुन्हा तक्रार केल असुन या तक्रारीत म्हटले आहे की आपले अधिपत्या खाली काम करत असलेल्या कनिष्ठ कार्यालयाने आपले आदेशाची अंमलबजावणी करण्या ऐवजी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांची एक प्रकारे पाठराखणच केली आहे .सदर आपले कडील आदेशाचे पालन कनिष्ठ कार्यालयांनी का केली नाही याची आपले स्थरावर चौकशी करावी व विद्यापीठ अभियांता यांनी मुळाधरणात विनापरवाना बेकायदेशीरित्या टाकलेला मुरूम तात्काळ काढून घेण्यात यावा अन्यथा १५ ऑगस्ट २०२३ रोजी मुळा धरणावर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा या निवेदनात करण्यात आला आहे .