नगरपालिका सावनेर तर्फे (POP)प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनविलेले श्रीचे मुर्त्या जब्त करण्यात आले .

1.

Bpslivenews network

ब्यूरो प्रतिनिधी - वाहिद शेख 

सावनेर : 22 ऑगस्ट - 

पावसाळा लागला की गणेशोत्सवाची चाहूल लागते. बाप्पाच्या आगमनाची वाट पाहिले जाते. गणेशोत्सवाच्या आठवणी रंगतात, देखावे, मनोरे, मिरवणूक, ढोल-ताशा अशीही चर्चा रंगू लागते. येत्या 31 ऑगस्ट 2022 पासून गणेशोत्सव सुरू होणार आहे. 

गणेशोत्सव करीता बाजारपेठ फुल्ल झाल्या आहेत. गणपतीसाठी लागणाऱ्या अनेक वस्तूंनी दुकाने गजबजली आहेत. अगदी गणपतीच्या शाडूच्या सुबक मुर्त्यांपासून ते डेकोरेशनच्या बारीक सारीक साहित्यापर्यंत सर्वच. पण या सर्वांमध्ये प्लास्टर ऑफ पॅरीसच्या (POP) गणपतीच्या मूर्त्या पर्यावरणाला हानिकारक असल्याच्या कारणावरून केंद्र सरकारने 12 मे 2020 रोजी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीच्या मूर्तीवर बंदी घातलेली आहे. तसेच राज्य सरकारने सुध्धा पीओपीच्या मूर्तीवर बंदी घातली आहे. त्याअंतर्गत नागपूर जिल्हात देखील पीओपीच्या मूर्तीची विक्री, साठवणूक करण्यास बंदी घातली आहे. त्याच अनुषंगाने नागपूर जिल्ह्याील सावनेर नगरपालिकातील स्वच्छ्ता विभागाच्या अंतर्गत पिओपीच्या मुर्त्या विकणारे सावनेर शहरातील दुकानदार यांच्यावर धडक कारवाई करण्यात आली ..ज्यामुळे पिओपीच्या मुर्त्या विकणारे दुकानदार यांच्याकडून प्रतिबंधित श्रीच्या मुर्त्या जब्त करण्यात आल्या व भविष्यात अशा मुर्त्या आढळल्यास दुकानदारांवर दंड आणि दुकानात सिल सुध्धा लावण्यात येईल अशी समज नगरपालिका सावनेर तर्फे देण्यात आले .तसेच पूढ़े फक्त मातीची मूर्ति विकावे असा संदेश शहरातील मूर्ती दुकानदारांना देन्यात आले.

सदर ची कारवाई मुख्याधिकारी हर्षला राणे यांच्या मार्गदर्शनात केली असून सावनेर नगरपालिकेतील स्वच्छ्ता विभाग आधिकारी धीरज देशमुख यांच्या नेतृत्वात करण्यात आली .

स्वच्छता विभाग अधिकारी धीरज देशमुख यांचासह दिनेश बुधे निरज काळे, अमोल कांबळे, प्रदिप गवई, मधुकर लोही,संजय वाघमारे, विजय वालमीकी, प्रफुल शाहणे, निलेश नकाशे, विनय वाघमारे इत्यादींनी ह्या मोहिमेत भाग घेतला .