मेटे साहेबांचे काम फक्त मराठा समाजाचे नसून बहुजन समाजासाठी आयुष्यभर तळमळ करणारा नेता महाराष्ट्राने गमावला-संदीप राव बामदळे

मेटे साहेबांचे काम फक्त मराठा समाजाचे नसून बहुजन समाजासाठी आयुष्यभर तळमळ करणारा नेता महाराष्ट्राने गमावला-संदीप राव बामदळे

*मेटे साहेबांचे काम फक्त मराठा समाजाचे नसून बहुजन समाजासाठी आयुष्यभर तळमळ करणारा नेता महाराष्ट्राने गमावला . सदिपंराव बामदळे*

शेवगाव 14 ऑगस्ट रोजी भल्या पहाटे मराठा समाजाच्या आरक्षण समितीच्या बैठकीसाठी मुंबईला जाताना माननीय आमदार स्वर्गीय विनायकरावजी मेटे यांचे अपघाती निधन झाले मराठवाड्यातील सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊन आखे आयुष्य मराठा समाज आरक्षणासाठी कायम लढा देणारे नेतृत्व म्हणून त्यांना ओळखले जाते आजच्या महाराष्ट्र त्यांच्या अपघातात हळहळ व्यक्त केली त्यांचे राहिलेले स्वप्न शिवसंग्रामच्या माध्यमातून सर्व शिवसंग्राम परिवार त्याचे स्वप्न पूर्ण केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल 

 विनायकराव मेटे साहेब यांची अस्थीकलश यात्रा आली असता शेवगाव येथील सर्व पक्षीय व सर्व संघटनेच्या वतीने अस्थी पूजन व श्रद्धांजली वाहण्यात आली.

सरकारने आत्ताही आरक्षण नाही दिले तर मराठा आरक्षणाची लढाई आणखी बुलंद करुन आरक्षण देण्यास सरकार ला भाग पाडणे हीच विनायकराव मेटे साहेबांना श्रद्धांजली ठरेल

 मराठा आरक्षण अंतिम टप्प्यात आले असताना विनायकराव मेटेसाहेब यांचे निधन दुर्दैवी आहे.त्यांच्या जाण्याने आरक्षणाची ही चळवळ थांबणार नाही किंबहुना ती अधिक बुलंद होईल त्यासाठी समाजाने ताकद एकवटली पाहिजे अशी अपेक्षा शिवसंग्रामचे जिल्हा अध्यक्ष सुरेशराव शेटे यांनी व्यक्त केली.

यावेळी आपले विचार मांडताना आरक्षण म्हणजे सामाजिक भिक नाही तर सामाजिक प्रतिनिधित्व हक्क आहे. प्रतिनिधित्व जे शिक्षण, नोकरी, व्यवसाय,राजकारण यामध्ये सामाजिक न्यायाची भूमिका प्रतिनिधित्व करणे म्हणजे आरक्षण आहे.जेव्हा मराठा समाजाला आरक्षण व मेटे साहेबांनी अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे जगातील सर्वात उंच स्मारक उभारण्यासाठी पाठपुरावा केला होता ते सरकारने पुर्ण करावे तीच खरी विनायकराव मेटे श्रद्धांजली असेल असे विचार लबडे महाराज यांनी श्रद्धांजली वाहताना मांडले.यावेळी वारकरी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष वाळके महाराज शिवसंग्राम जिल्हा अध्यक्ष सुरेशराव शेटे, तालुका अध्यक्ष नवनाथ इसारवाडे, शिव अभिषेक समितीचे शिवसंग्राम जिल्हा सरचिटणीस संदीपराव बामदळे.अशोक कुसळकर. विकास गटकळ. महेश घनवट. नंदू नांद्रे. रामभाऊ ढोकणे संजय पवार कानिफनाथ धुमाळ सतीश पवार विष्णुपंत घनवट .ह भ प वाळके महाराज ह भ प माळवदे महाराज ह भ प कल्याण महाराज पवार लक्ष्मणराव काशीद बंडूशेठ रासने रामनाथ राजापुरे बाबासाहेब गरड कानिफनाथ धुमाळ . संस्थापक अध्यक्ष मराठा भुषण चंद्रकांत महाराज लबडे,मराठा महासंघाचे संस्थापक डाँ कृषिराज टकले,मनसे तालुका अध्यक्ष गणेश रांजवणे, शेतकरी संघटनेचे दत्तात्रय फुंदे,वंचित बहुजन चे तालुका अध्यक्ष प्यारेलाल भाईशेख,सुनील रासने,विक्रम दारकुंडे, गवळी सर,विजयराव देशमुख, डॉ लांडे, विष्णू घनवट,अंकुश डांभे,सुरेश लांडे, अभय गोरे, चैतन्य घोडेचोर,दिनेश वाणी यांच्या सह असंख्य मेटे साहेबावर प्रेम करणारे उपस्थित होते..