जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवे देडगाव येथे शाळापूर्व तयारी पहिला मेळावा उत्साहात साजरा. या शाळेने केला आगळा वेगळा उपक्रम पाहा सविस्तर.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवे देडगाव येथे शाळापूर्व तयारी पहिला मेळावा उत्साहात साजरा. या शाळेने केला आगळा वेगळा उपक्रम पाहा सविस्तर.

देडगाव- येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवे देडगाव येथे बुधवार दि २०/०४/२०२२ रोजी शाळा पूर्व तयारी पहिला मेळावा उत्साहात संपन्न झाला.यावेळी

नवागतांची वाजतगाजत मिरवणूक,ढोल पथक,सेल्फी पॉइंट, नाव नोंदणी,वजन व उंची

,शारीरिक विकास,बौद्धिक विकास,सामाजिक व भावनिक विकास,भाषिक विकास,गणनपूर्व तयारी,बासरीवादन,चित्रकला,मिष्टान्न भोजन,विद्यार्थ्यांना,पालकांना

मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले. तसेच पहिलीत नव्याने प्रवेश घेतलेल्या मुलांचे आगळे वेगळे स्वागत केलेले पाहुन पालकांनी समाधान व्यक्त केले.या कार्यक्रमासाठी पालक वर्ग,ग्रामस्थ,शाळा व्यवस्थापन समिती व सर्व सदस्य,शिक्षणप्रेमी उपस्थित होते .

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक श्रीमती मनिषा कांबळे मॅडम यांनी केले. तर आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री अभिषेक घटमाळ सर यांनी केले.या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.