डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून राजवाडा परिसरातील जयभीम मित्र मंडळाच्या वतीने आयोजित नियोजन बैठकीत उत्सवाला भव्य स्वरूप देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून राजवाडा परिसरातील जयभीम मित्र मंडळाच्या वतीने आयोजित नियोजन बैठकीत उत्सवाला भव्य स्वरूप देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि तरुण


कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही बैठक उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली.
राहुरी ता प्रती - डॉ देवेंद्र शिंदे
बैठकीच्या प्रारंभी गतवर्षी साजऱ्या झालेल्या जयंती उत्सवाचे परीक्षण करण्यात आले. त्यानंतर या वर्षीचा उत्सव अधिक शिस्तबद्ध, भव्य आणि सांस्कृतिक पद्धतीने व्हावा यासाठी चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर जयंती उत्सवासाठी विविध पदांवर सर्वानुमते निवडी करण्यात आल्या
अध्यक्ष : विलास नाना साळवे
उपाध्यक्ष : पिंटू नाना साळवे
खजिनदार : दादू साळवे
कार्याध्यक्ष : दिपक रामजी साळवे
जयंती उत्सवा साठी सर्वानुमते निवड झालेले अध्यक्ष विलासनाना साळवे यांनी सर्वांचे आभार मानत जयंती उत्सवाला समाजभिमुख, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी स्वरूप देण्याचा संकल्प व्यक्त केला.
या बैठकीतील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा दिपक रामजी साळवे यांनी उपस्थित केला.राजवाडा परिसरातील सर्व जेष्ठ आणि तरुणांनी यावर्षी देखील सर्व प्रकारची गटबाजी, मतभेद आणि राजकारण बाजूला ठेवून एकजुटीने उत्सव साजरा करण्याचा घेतलेला निर्णय.
यावेळी दादु साळवे यांनी स्पष्टपणे सांगितले की,
“राजवाडा कुटुंब म्हणून एकत्र येणे हीच आमची खरी ताकद. समाजातील एकी जपण्यासाठी जयंती हा एक मोठा अवसर आहे.”
राजवाडा व प्रभागातील नगरसेवक अरुण साळवे यांनी सांगितले की यावर्षी जयंती उत्सवाला पाच दिवसांचा भव्य आकार देण्यात येणार आहे. या कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, समाजजागृती उपक्रम, बौद्ध धम्मवाचन, प्रभातफेरी, स्पर्धा, व्याख्याने आणि सामुदायिक उपक्रम राबविण्यात येणार आहे
तसेच उपाध्यक्ष पिंटूनाना साळवे यांनी देखील सर्वांनी एकमुखीपणे यंदाचा उत्सव अधिक भव्य आणि प्रेरणादायी करण्याचे आश्वासन दिले.
विशेष म्हणजे समाजाला कायम दिशा देण्याचे काम करणारे. अजय सुरेश साळवे.आणि भुषण गोरक्षनाथ साळवे यांनी योग्य मार्गर्शन करून बैठकीला ला सुरुवात केली
यावेळी बैठकीस परिसरातील नगरसेवक अरुण साळवे.माजी नगरसेवक संजय साळवे.राजु शामराव साळवे.किरण बाबुराव साळवे.सुभाष साळवे. राजेंद्र साळवे. दिपक साळवे.प्रदीप हिवाळे.अनिल साळवे. दिपक भाऊसाहेब साळवे.सचिन महीपती साळवे.मोहन साळवे.रवि पलघडमल सचिन दौलत साळवे.सुनील रतन साळवे. नविन साळवे. रवि साळवे.दयानंद साळवे.सुनील चांदणे.करण साळवे.विजेंद्र गायकवाड.विकी कसबे.संदीप साळवे.सिद्धांत साळवे.सुनील दाभाडे.बाळु हिवाळे.इम्रान सय्यद.सलमान खान.राजवाडा परिसरातील नागरिक, तरुण वर्ग, महिला मंडळ, जयभीम मित्र मंडळाचे पदाधिकारी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होतेख्येने उपस्थित होते








