पंकजा मुंडे यांच्या ब्रीफिंगला गैरहजर; LAS अधिकारी देवेंद्र सिंह निलंबित

पंकजा मुंडे यांच्या ब्रीफिंगला गैरहजर; LAS अधिकारी देवेंद्र सिंह निलंबित

प्रसाद घोगरे | 9370328944
Delhi 91 प्रतिनिधी.
28/02/2026

पंकजा मुंडे यांच्या ब्रीफिंगला गैरहजर; LAS एम. देवेंद्र सिंह निलंबित

मुंबई/बीड प्रतिनिधी : राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी अधिवेशनातील एका महत्त्वाच्या विषयावर ब्रीफिंगसाठी बोलावूनही अनुपस्थित राहिल्याच्या कारणावरून आयएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंह यांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

एम. देवेंद्र सिंह हे सन २०११ बॅचचे आयएएस अधिकारी असून त्यांनी बीड जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. सध्या ते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) येथे सदस्य सचिव पदावर कार्यरत आहेत. अधिवेशनादरम्यान पर्यावरण विभागाशी संबंधित विषयावर मंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांना ब्रीफिंगसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. मात्र संबंधित अधिकारी गैरहजर राहिल्याचा मुद्दा सभागृहात मांडण्यात आला. त्यानंतर विधीमंडळातून निलंबनाचे आदेश देण्यात आल्याचे सांगितले जाते.
या कारवाईनंतर प्रशासनातील शिस्त, मंत्री-अधिकारी समन्वय आणि जबाबदारी या मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली आहे. “सनदी अधिकारी जर मंत्र्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत असतील, तर सर्वसामान्य नागरिकांच्या कामांचे काय?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील काही सनदी अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबतही नाराजी व्यक्त होत असून, नागरिकांची प्रलंबित कामे, दिरंगाई आणि ‘स्टंटबाजी’च्या आरोपांमुळे स्थानिक पातळीवर असंतोष वाढल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीकडे लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

(टीप : पंकजा मुंडे व एम. देवेंद्र सिंह यांच्यासोबतचा प्रसारित फोटो जुना असल्याचे सांगितले जाते.)