बालाजी देडगाव येथे भगवान बाबीर बाबाच्या ( कोकरे वस्ती) अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात.

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील दरवर्षीप्रमाणे ह भ प सुखदेव महाराज मुंगसे व ह भ प सदाशिव महाराज पुंड यांच्या मार्गदर्शनाखाली बाबीर बाबाच्या सप्ताहास सुरू वात झाली आहे .हा सप्ताह गेल्या 28 वर्षापासून अखंड रित्याने चालू आहे . बालाजी देडगाव हे अतिशय धार्मिक गाव असून या गावांमध्ये सात ते आठ सप्ताह मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरे केले जातात. या गावाची संस्कृती अतिशय धार्मिक आहे .या अखंड सप्ताहाची योग्य रीतीने काळजी घेत योग्य ते नियोजन आयोजक मंडळी मोठे कष्ट घेऊन करत आहेत.

या सप्ताहाची सुरुवात दि. 18 रोजी सुरुवात झाली.

या सप्ताहामध्ये दैनंदिन कार्यक्रम पहाटे 4 ते 5 काकडा भजन व 8 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ व रात्री 7 ते 9 नामांकित महाराजांचे कीर्तन होतील.

1 )शुक्रवार दि.12 ला ह भ प प्रदीप महाराज वाघमोडे श्री क्षेत्र पाचुंदा 2)शनिवार दि. 13 रोजी ह भ प सुखदेव महाराज मुंगसे श्री क्षेत्र बालाजी देडगाव 

3)रविवार दीं. 14 रोजी ह भ प रामदास महाराज निर्मळ श्री क्षेत्र तांदुळवाडी 4)सोमवार दि. 15 रोजी ह भ प प्रभाकर महाराज कावले. श्री क्षेत्र श्रीरामपूर या नामांकित महाराजांचे कीर्तन होतील. व 5) मंगळवार दि. 16 रोजी ह भ प शिवानंद महाराज शास्त्री श्री क्षेत्र पैठण संस्थान यांचे सकाळी 9 ते 11 या दरम्यान काल्याचे किर्तन होईल.

  यानंतर महाप्रसादाने या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होईल.

   या सप्ताहासाठी या कार्यक्रमाचे व्यवस्थापक ह भ प मारुती महाराज चेके, काकडा व हरिपाठ ह भ प प्रदीप महाराज वाघमोडे, ह भ प सुधाकर महाराज चेन्ने ,व्यासपीठ चालक ह भ प बिरू महाराज पिसाळ वांगी ,हार्मोनियम वादक ह भ प आसाराम महाराज पिसाळ, मृदुंगाचार्य ह भ प हरी महाराज पिसाळ वांगी ,टाळकरी मंडळी ,ह भ प ठकाजी महाराज दिंडे,ह भ प फुलचंद महाराज कोकरे ,ह भ प सोमनाथ महाराज काळे ,ह भ प शिवाजी महाराज थोरात ,ह भ प ज्ञानेश्वर महाराज होंडे, ह भ प विनायक महाराज ससाने ,व समस्त भजनी मंडळ देडगाव पाचुंदा व श्री गणेश भजनी मंडळ वांगी व समस्त कोकरे, गोयकर, टकले परीवार व समस्त ग्रामस्थ बालाजी देडगाव यांचे मोलाचे सहकार्य आहे.

या कार्यक्रमासाठी संत कृपा साऊंड सिस्टिम व भव्य मंडप जेऊर हैबती यांचेही मोलाचे सहकार्य आहे.