घोडेगाव चांदा रोडवरील एटीएम मशीन फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला..
घोडेगाव चांदा रोडवरील एटीएम मशीन फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला..
खेडले परमानंद ( वार्ताहर) -- नेवासा तालुक्यातील घोडेगाव चांदा रोडवरील बाळासाहेब जावळे यांच्या पंचवटी काॅप्लेक्स मध्ये असलेल्या सेंट्रल बॅक आॅफ इंडियाच्या शाखा चांदा यांचे एटीएम मशीन दि. २७ सप्टेंबर रोजी च्या रात्री साडेबारा ते पहाटे साडेचार वाजेच्या दरम्यान कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीनची गॅस कटरच्या सहाय्याने तोडफोड करून आतील रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला व आतील सी सी टी व्ही कॅमेरयावर स्प्रे मारुन नुकसान केल्याच्या प्रयत्न केला.
असल्याची फिर्याद सुयोग महादेव परमाळे रा. कात्रज पुणे यांनी सोनई पोलीस ठाण्यात दिली आहे.४४८/२०२३ भादवी कलम ३७९,४२७,५११ प्रमाणे अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पो. हे. काॅ.दत्तात्रय गावडे हे करत आहे.घटनेची माहिती मिळताच शेवगाव उप विभागीय अधिकारी पाटील व सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी घटना स्थळी जाऊन पहाणी केली.