पैशाचा बंडल_शिर्डीत प्रामाणिकपणाचे दर्शन : निलेश कोते.

पैशाचा बंडल_शिर्डीत प्रामाणिकपणाचे दर्शन : निलेश कोते.

पैशाचा बंडल_शिर्डीत प्रामाणिकपणाचे दर्शन : निलेश कोते.

प्रतिनिधी_प्रसाद घोगरे_९३७०३२८९४४.

सविस्तर_ जालना येथील साईभक्त गजानन सव्वाराव म्हसके.. याची पत्नी पोटाच्या विकाराने त्रस्त असल्याने साईबाबा हॉस्पिटल शिर्डी येथे उपचार घेत आहे..

आपल्या पत्नीस लवकर बरे वाटावे म्हणून म्हसके हे साईंच्या द्वारकामाईतून दर्शन घेऊन बाहेर पडत असतानाचं, म्हसके यांना तब्बल ₹१४,००० रुपयाचा बंडल सापडला.. म्हसके हे सर्वसामान्य कुुंबातील असल्याने त्यांना सापडलेली रक्कम ही निश्चितच त्यांच्यासाठी खूप मोठी होती.

परंतु म्हसके यांनी क्षनाचाही विलंब न करता, सदरची रक्कम सुरक्षा कर्मचाऱ्याकडे सोपवली आणि सदर कर्मचारी यांनी, या व्यक्तीला घेऊन सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी साहेब यांच्याकडे आले..

सुरक्षा ऑफीस येथे कामानिमित्ताने निलेश कोते व दिपक वारुळे हे माळी साहेबांकडे आलेले होते.. तेव्हा कोते यांनी सदरील व्यक्तीची विचारपूस केली असता त्यांनी त्यांचं नाव _ गजानन सव्वाराव म्हसके.. केंदली जिल्हा जालना असे सागितले, कार्यालयात चर्चे दरम्यान असे समजले की, सदरील साईभक्त हे अतिशय गरीब परिस्थितीतील आहेत, त्यात त्याची बायको रुग्णालयात उपचार घेत आहेत, अश्या परिस्थितीत सुद्धा गजानन म्हसके यांनी प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले आणि त्यांना सापडलेला ₹१४.०००. हजार रुपयांचा बंडल, माळी साहेबांकडे सुपूर्त करून, समाजाला आणि शिर्डी करांना प्रामाणिक पणाचे दर्शन घडवले, त्याबद्दल उपस्थितांनी गजानन म्हसके यांचा सत्कार केला.

शिर्डीत काही लोकांकडून सर्रास पैशांसाठी साई भक्तांची लूट होणे, पाकीट मारी, चोरी, अवैध्य व्यवसाय, गुन्हेगारी असे प्रकार कायम घडतांना दिसतात, त्या सर्वांसमोर जालना येथील साईभक्त_गजानन म्हसके यांनी, पैशा पेक्षा प्रामाणिकपणा हेच सर्वकाही असल्याचे जिवंत उदाहरण निर्माण केल्याचे दिसते, आतातरी यातून ही ठराविक मंडळी बोध घेउन साई नगरी सुरक्षित करतील अशी अपेक्षा साईभक्त व्यक्त करताय.