आम आदमी पार्टी चे कार्यकर्ते नी टेकडीच्या शाळेमध्ये घेतली बैठक*

सावनेर

*आम आदमी पार्टी चे कार्यकर्ते नी टेकडीच्या शाळेमध्ये घेतली बैठक*

बी.पी एस लाईव्ह न्युज नेटवर्क                                        नागपूर:-सावनेर येथील आम आदमी पार्टी चे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी आज टेकडी शाळां नगरपरिषद सावनेर येथे शाळेच्या मुख्याध्यापिक यांची भेट घेतली असता सदर महाराष्ट्र शासनाने परीपत्रकानुसार जो जीआर काढलेला होता त्या जीआरच्यानुसार ज्या शाळेची पटसंख्या २० च्या खाली आहे अशा

सर्व शाळा बंद करण्यात येईल असे आदेश महाराष्ट्र शासनाने काढले होते . त्या आदेशाचा बाबत एक बैठक घेऊन या विषयावर चर्चा झाली यांच्यासोबत सरकारांने या संदर्भातील आदेश काढताना कमी गुनवन्तेचा शाळेत पटसंख्या कमी होत असल्याने तसेच अशा शाळेमध्ये विद्यार्थांचे कमी गुणवत्तेचे वातावरणात निर्माण होण्याची शक्यता टाळता येत नाही व जवळच्या चांगल्या शाळेमध्ये समाजयोजन करून शैक्षणिक दृष्ट्या व सामाजिकदृष्ट्या मुलींसाठी जास्त योग्य ठरेल अशा शिक्षण घेण्यात आली. नियमाच्या विरोधात आज तहसीलदार प्रताप वाघमारे यांना निवेदन देण्यात आले. जिल्ह्याचे उपाध्यक्ष संजय टेंभेकर आणि तालुक्याचे अध्यक्ष संजय राऊत व शहराचे अध्यक्ष गजानन चौधरी तालुक्याच्या व शहराच्या कमिटी मध्ये असणारे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते .शुभम बागडे दिनेश मछले कुणाल कोलते वैशाली जंजाळ लिलाबाई वार्ड क्रमांक १४किल्ला या कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते.