पोलीस जाणीव सेवा संघ बार्शी तालुका शाखा कासारवाडी च्या वतीने देवीच्या पालखीनिमित्त कासारवाडीतील सर्व ग्रामस्थांना मसाला दूध वाटप.

बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे (बार्शी)

दि-10-10-2022               पोलीस जाणीव सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष- मा. रवीसर फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलीस जाणीव सेवा संघाचे बार्शी तालुका विभाग प्रमुख- उमेश आनेराव,  तालुका संपर्क प्रमुख सम्मेद तरटे, यांच्या सहकार्याने कासरवाडी गावामध्ये सर्व ग्रामस्थांना पोलीस जाणीव सेवा संघ शाखा कासारवाडी च्या वतीने मसाला दुधाचे वाटप करण्यात आले.

यावेळी गावातील जास्तीत जास्त भाविकांनी याचा लाभ घेतला. यावेळी कासारवाडी शाखेचे शाखाप्रमुख- प्रशांत गुंड, अध्यक्ष- निशिकांत सुतार, उपाध्यक्ष- अमोल चौधरी, सचिव- अक्षय शिंदे, सहसचिव- चंद्रकांत कदम, सदस्य- हनुमंत निंबाळकर या सर्व पदाधिकाऱ्यांनी फुलं फुलाची पाकळी या अंतर्गत हा कार्यक्रम राबवला.

यावेळी सर्व ग्रामस्थांनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला.