स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई महाविद्यालय परिसरात विनाकारण फिरणाऱ्या २२ टवाळ खोरांवर कारवाई.
दिल्ली 91 न्यूज नेटवर्क
अहमदनगर शहरामधील महाविद्यालय परिसरामध्ये विनाकारण फिरणाऱ्या 22 टवाळखोर मुलांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई .
शहरातील महाविद्यालय परिसरामध्ये टवाळखोर मुले विनाकारण जमुन महाविद्यालयामध्ये येणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थीनींना त्रास होईल असे वर्तन करीत असल्या पोलीस अधीक्षक राकेश ओला अहमदनगर व स्थानिक गुन्हे शाखेकडे तक्रारी आली होती .
त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे, हेमंत थोरात, सहाय्यक फौजदार राजेंद्र वाघ, पोलिस हेड कॉन्स्टेबल सुनिल चव्हाण, विजय वेठेकर, दत्तात्रय हिंगडे, संदीप पवार, पोलिस नाईक विशाल दळवी, लक्ष्मण खोकले, भिमराज खर्से, संदीप चव्हाण, पोलिस काँन्टेबल सागर ससाणे, चालक पोकॉ/अरुण मोरे असे अधिकारी व पोलीस अंमलदार यांना अहमदनगर शहरामधील महाविद्यालय परिसरामध्ये विनाकारण फिरणाऱ्या टवाळखोर मुलांविरुध्द कारवाई करण्याच्य सुचना देवुन रवाना केले होते.
पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार अशांनी अहमदनगर शहरातील न्यु आर्ट ऍ़ण्ड सायन्स कॉलेज अहमदनगर, पेमराज सारडा महाविद्यालय परिसरामध्ये पेट्रोलिंग करुन महाविद्यालयाचे परिसरामध्ये विनाकारण फिरणारे व महाविद्यालयामध्ये येणारे विद्यार्थी व विद्यार्थीनींना त्रास होईल असे वर्तन करणारे एकुण 22 मुलांना ताब्यात घेवुन पुढील कार्यवाहीकामी तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर आहे. सदर मिळुन आलेल्या मुलांविरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये कारवाई करण्यात आली असुन सदर मुलांना व त्यांचे पालकांना याबाबत समज देण्यात आली आहे.
अहमदनगर शहरामध्ये लहान मुलांचे किरकोळ भांडणातुन घडणाऱ्या गंभीर स्वरुपाचे गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी तसेच महाविद्यालयामध्ये येणाऱ्या - जाणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थीनी यांच्या सुरक्षेकरीता या पुढेही अहमदनगर शहरामधील महाविद्यालय, विद्यालये, शाळा परिसरामध्ये स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे मार्फतीने पेट्रोलिंग करुन महाविद्यालय परिसरामध्ये विनाकारण फिरणाऱ्या टवाळखोर मुलांवर कारवाई करण्यात येणार आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अहमदनगर, प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर, अनिल कातकाडे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग, यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.