राहुरी शहर व परिसरातील वाहतूक सुरळीत करणे बाबत व्यापारी असोसिएशनच्या वतीने तहसीलदारांना दिले निवेदन .

राहुरी शहर व परिसरातील वाहतूक सुरळीत करणे बाबत व्यापारी असोसिएशनच्या वतीने तहसीलदारांना दिले निवेदन .

                राहुरी शहर व परिसरातील वाहतूक सुरळीत करणे बाबत राहुरी शहरातील व्यापारी असोसिएशनच्या वतीने राहुरी तहसीलदार यांना दिनांक 22 /05/ 2024 रोजी निवेदन देण्यात आले आहे .या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की राहुरी शहरा लगत असणारे नगर मनमाड महामार्गावर दिनांक 18/05/ 2019 रोजी सायंकाळी शहरातील ज्येष्ठ व्यापारी कुंदनलाल सुराणा यांचा अपघात होऊन जागीच मृत्यू झाला आहे .गेल्या अनेक दिवसांपासून असे अनेक छोटे-मोठे अपघात या महामार्गावर शहरा नजीक होत असतात .हे अपघात होऊ नये यासाठी कारणीभूत असलेल्या समस्यांचा देखील या निवेदनात उल्लेख केला आहे. त्यामध्ये प्रामुख्यानेराहुरी शहर परिसरातील पाण्याची टाकीचे बालाजी मंदिर परिसर रस्त्याच्या कडेने पांढरी पट्टी मारणे, राहुरी शहरातील नगर मनमाड रस्त्यावरील अतिक्रमांवर निर्बंध घालने व अस्तव्यस्त वाहतूक सुरळीत करणे,राहुरी शहरात वाहतूक व्यवस्थापन घालून देणे व अतिक्रम निर्बंध टाकणे,शहरातील राजमाता जिजाऊ चौक येथे वाहतूक सिग्नल चालू करणे व कायमस्वरूपी वाहतूक पोलीस यांचे नियुक्ती करणे, संतगाडगे बाबा आश्रम, एसटी बस स्थानक व धावडे पेट्रोल पंप समोर गतिरोधक बसून त्यावर पांढरे पट्टे मारण्यात यावेत या सर्व समस्यांचे निवेदनात उल्लेख करण्यात आलेला आहे.

 

               व्यापारी असोसिएशनच्या वतीने निवेदन देतेवेळी तहसीलदारांशी सर्व समस्यावर चर्चा करण्यात आली .दिलेल्या निवेदनावर काय कारवाई होणार व किती दिवसात कारवाई होणार किंवा अजून किती जणांचे बळी जाण्याचे प्रशासन वाट पाहणार याकडे राहुरी शहरवासी यांचे लक्ष लागून आहे . निवेदन देतेवेळी व्यापारी असोसिएशनचे प्रकाश पारख,, देवेंद्र लांबे, संजीव उदावंत, संतोष लोढा,अनिल कासार, सूर्यकांत भुजाडे, बाळासाहेब उंडे, कांता तनपुरे,, प्रवीण ठोकळे,, गणेश नेहे,कादरी अन्वर, सचिन वने,दीपक मुथा,,नवनीत दरक, अक्षय तनपुरे ,संतोष आळंदे ,अशोक घाडगे, सुहास कोळपकर सह अनेक व्यापारी बांधव उपस्थित होते.व्यापारी असोसिएशनच्या वतीने देण्यात आलेले निवेदन स्वीकारण्यासाठी राहुरी चे तहसीलदार नामदेव पाटील,, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे,एसटी वाहतूक नियंत्रक बी . डी .भोसले, रा . न . पा चे प्रशासकीय अधिकारी .जी .एम . बावडकर व अभियंता पराग दराडे उपस्थित होते .यावेळी सार्वजनिक बांधकामाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत बैठक संपल्यानंतर दुपारी नगर मनमाड महामार्गावर गाडगे बाबा आश्रम शाळा,राहुरी बस स्थानक ते धावडे पेट्रोल पंप समोरील बाजूस गतिरोधक बसवण्याच्या कामी सर्वेक्षण केल्याचे समजले असून प्रत्यक्ष कारवाई लगेच होणार की वाट पाहावी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे .