शिरेगाव येथे सुरू असलेल्या संगीत नवनाथ कथेला राज्यभरातून भाविकांची गर्दी.
प्रतिनिधी संभाजी शिंदे ,खेडले परमानंद
शिरेगाव या ठिकाणी सुरू असलेल्या संगीत नवनाथ कथेला हजारो भाविकांची गर्दी. दिलीप पाटकर साहेब यांनी या कथेचे आयोजन त्यांच्या वडिलांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त केले आहे.
शिरेगाव या ठिकाणी सुरू असलेल्या संगीत नवनाथ कथेला दैनिक स्वरूपात हजारो भाविकांनी आपली उपस्थिती नोंदवली. परम पूजनीय श्री श्री अरुण नाथ गिरीजी महाराज यांनी आपल्या सुश्राव्य वाणीतून संगीत नवनाथ कथा सांगितली.
या कथेला राज्यभरातून भाविक भक्त उपस्थित होते.
अनेक संत महंत, नेते ,सेलिब्रिटी यांनी या संगीत कथेला भेट दिली. काल या कथेला गुरुवर्य रमेश गिरी जी महाराज यांनी भेट देऊन अरुण गिरीजी महाराज यांचे कौतुक केले.
त्याचप्रमाणे भाजपाचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी संपूर्ण कथा श्रवण केली,
यावेळी बोलताना गुरुवर्य रमेश गिरीजी महाराज म्हणाले की अनेक संगीत कथा झाल्या परंतु एक आव्हान म्हणून असलेली संगीत नवनाथ कथा जगद्गुरु अरुणनाथ गिरीजी महाराज यांनी स्वीकारून ती पार पाडली.
या संगीत कथेला वागमय स्वरूपात रूपांतरित करण्याचे काम जगद्गुरु अरुण गिरीजी महाराज यांचे शिष्य बापू यांनी केले व त्यांना संगीत संयोजनाचे काम त्यांच्या शिष्य मंडळींनी केले.
या कथेला दैनिक स्वरूपात गर्दी वाढतच चाललेली दिसून येत होती. प्रचंड मोठा मंडप असतानाही लोकांना जागा पुरत नव्हती लोक रस्त्यावर जागा मिळेल त्या ठिकाणी उभे राहून कथा श्रवण करीत होते. कथेमध्ये सुरू असलेले संगीत भजन च्या वेळेस सुरू व्हायचे अलख निरंजन आदेश या नामाच्या गजरात भाविक तल्लीन होऊन देहभान विसरून नाचत असे.