सोनई परिसरातील तरुणाई मटक्याच्या आहारी ? मटका, जुगार, अवैध दारू विक्री जोरात .वर्दीतील गुंडा सक्रिय झाल्यामुळे गुन्हेगारीस पोषक वातावरण.
सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे तेजीत ?
पोलीस ठाण्याचें आधिकारी देताहेत अवैध धंदे वाल्याना पाठबळ.
(प्रतिनिधी खेडले परमानंद )
सोनई परिसरातील अवैध धंद्यासह वाढती गुन्हेगारी रोखण्यास सोनई पोलीस सपशेल अपयशी ठरले असून अनेक प्रलंबित गुन्ह्याचा तपास अद्याप सोनई पोलिसांना लावता आलेला नसल्याने शहरात गुन्हेगारी वाढत आहे.भुरट्या चोऱ्या,अवैध दारू विक्री,मटका,खुलेआम होणारी मावा विक्री तसेच शहर व परिसरात घडणाऱ्या गुन्हेगारीवर सोनई पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या अंतर्गत कुरघोड्यांमुळे आवर घालणे अश्यक्य झाले आहे
सोनई गांवतच प्रत्येक चौकात असंख्य ठिकाणी सुरू अवैध दारू विक्री, मावा विक्री,मटका व जुगारा कडे तरुणाई याकडे वळत असली तरी पोलिसांना हे व्यवसाय बंद करण्यात रस नसून पोलिसांना यातून मिळणारी गंगाजळी महत्वाची आहे.
अनेक गुन्ह्यांचा तपासात लागत नसून मागील काही महिन्यांपूर्वी झालेल्या घरफोड्या चा तपास अद्याप लागला नाही अनेक भुरट्या चोरांकडून मोबाईल,महिलांचे दागिने,पर्स लंबिवण्याचे प्रकार सर्रास सुरू असले तरी पोलीस मात्र ठोस कारवाई करताना दिसत नसून फक्त तक्रार अर्ज घेऊन नागरिकांचे समाधान करत असतात.
पोलीस ठाण्यातील जुने-नव्या कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत वादाच्या फटका ही कारवाईवर होतांना दिसतो.बरेच कर्मचारी नव्याने रुजू झाल्याने कायम पोलीस ठाण्यात तू-तू मै-मै कायम सुरू असते.मात्र वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा यावर अंकुश नसल्याने असे प्रकार सातत्याने ठाण्यात घडत असल्याचे एका पोलीस कर्मचाऱ्याने नाव उघड न करण्याचा अटीवर सांगितले काही कर्मचारी कारवाई करतात मात्र त्यांची ही
कारवाई बनावट असल्याचे ही पोलीस ठाण्यात बोलले जाते.
अनेक संघटनांनी तक्रारी करून ही अवैध व्यवसायावर अंकुश लावणे पोलिसांना जमेनासे झाले असून तात्पुरती कारवाई करत अवैध व्यावसायिक मालकांऐवजी नोकर वर्गावर कारवाई करून सोडून दिले जाते.अवैध व्यवसायिक व पोलिसांची जोडलेली नाळ कोण तोडणार हा खरा प्रश्न आहे
सोनई येथील अवैध धंदे हि तर नित्याचीच बाब बनली आहे गावठी कट्टे , वाळूतस्करी,गुटखा, जुगार , मटका, गोमांस तस्करी , दिवसा होणारी रस्ता लूट तसेच विविध अवैध धंद्यावर सोनई पोलीस स्टेशन चा अंकुश राहिलेला नाही