कुष्ठरोग निर्मुलनासाठी उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल कुष्ठरोग तंत्रज्ञ डॉ. बबन शिंदे राज्यस्तरीय पुरस्कारने सन्मानित .

कुष्ठरोग निर्मुलनासाठी उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल कुष्ठरोग तंत्रज्ञ डॉ. बबन शिंदे राज्यस्तरीय पुरस्कारने सन्मानित .

           अहमदनगर जिल्ह्यातील कुष्ठरोग तंत्रज्ञ डॉ.बबन रामभाऊ शिंदे यांना अकोले तालुक्यात कुष्ठरोग निर्मूलनासाठी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल डॉ. अर्चना पाटिल ( संचालिका महाराष्ट्र राज्य ) यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत दिनांक २९ मार्च २०२२ रोजी यशवंतराव चव्हाण प्रशासन प्रबोधनी (यशदा) पुणे येथे डॉ. आर.एस. आडकेकर ( सहसंचालक आरोग्य सेवा ,पुणे )यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला आहे .

         कुष्ठरोग निर्मूलन करण्यासाठी उपलब्ध कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे तरिही कुष्ठरोग तंत्रज्ञ डॉ. बबन शिंदे हे डॉ. राजेंद्र खंडागळे सहाय्यक संचालक कुष्ठरोग अहमदनगर यांच्या नेतृत्वाखाली कुष्ठरोग निर्मूलनाचे काम अहमदनगर जिल्हयातील श्रीगोंदा , अकोले आणि संगमनेर तालुक्यात अतिशय प्रभावीपणे करत आहे. श्रीगोंदा तालुक्यात उत्कृष्ठ कामगिरी करून अकोले तालुक्यातील फोफसंडी सारख्या अतिशय दूर्गम भागात जाऊन तेथील कुष्ठरोगी शोधून त्यांना शासकिय योजनांची माहिती व लाभ देऊन उपचाराखाली आणण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन शासनाने त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार दिल्याने अहमदनगर जिल्हाची मान अभिमानाने उंचावली आहे .

        श्रीगोंदा, अकोले तालुक्या प्रमाणे संगनेर तालुक्यातही कुष्ठरोग निर्मूलनाचे काम ५०% पूर्ण झाले आहे . या सर्व कामगिरीसाठी तालुक्यातील कर्मचारी व तालुका अरोग्य अधिकारी यांचे चांगले सहकार्य मिळत असल्याने कुष्ठरोग निर्मूलन कार्यास अधिक बळ मिळाल्याचे डॉ. बबन शिंदे यांनी BPS LIVE NEWS शी बोलताना सांगितले .

         राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल तालुका राहुरी येथे माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. सुभाष गोरे (राहुरी ),भारतीय पत्रकार संघटनेचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष श्री. कृष्णा गायकवाड, जिल्हा मीडिया प्रभारी श्री. आर. आर जाधव, जिल्हा समन्वयक श्री. सचिन पवार व संभाजी शिंदे यांनी डॉ. बबन शिंदे यांचा शाल्, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या आहे.