राहुरीच्या भर यात्रेत सुनेचे प्रेमप्रकरण पकडीत सासुने सुने ची केली धुलाई. तर पतीच्या प्रियसीला पत्नीने दिला चोप..

राहुरीच्या भर यात्रेत सुनेचे प्रेमप्रकरण पकडीत सासुने सुने ची केली धुलाई. तर पतीच्या प्रियसीला पत्नीने दिला चोप..

प्रतिनिधी:-राहुरी

राहुरी तालुक्यातील एका खेड्यातील रहिवासी असलेल्या विवाहित महिलेने सासुला गोडबोलुन चुना लावत आपल्या पती देवाला दारु पाजुन झोपी लावुन प्रियकराबरोबर राहुरीच्या यात्रेतील राहाट पाळण्यात बसण्याच्या तयारीत असतांना सासुने रंगेहाथ पकडत सुनाच्या प्रियकराच्या कानशिलात लावुन सुनेचे केस धरत मातीत लोळवत चांगलीच धुलाई केली.

एकीकडे राहुरीच्या यात्रा कमिटीच्या कुस्त्या सुरू असताना तर दुसरीकडे राहाट पाळणे परिसरात यात्रेकरूंना सासु सुनेची कुस्ती पाहायला मिळाली.

तर राहुरी शहरातील एकाने आपल्या पत्नीला‌ खोटे बोलुन राहुरीच्या यात्रेत प्रियसी बरोबर राहाट पाळण्यात बसण्याच्या तयारीत असताना पत्नीने रंगेहाथ पकडत पती बरोबर असलेल्या महिलेची येथेच्छ धुलाई केली.

या दोन वेगवेगळ्या राहाड्या मुळे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांची चांगलीच दमछाक झाली होती.

राहुरी शहरातील खंडेराया महाराजांची यात्रा सुरू असतांना संध्याकाळच्या दरम्यान राहुरी तालुक्यातील एका खेड्या गावातील विवाहित महिलेने आपल्या पतीला दारु पाजुन झोपी लावले व सासूल गोड बोलून मी मैत्रिणीकडे जाऊन आले असे म्हणून तोंडाला स्कार्फ बांधून निघाली मात्र सासुला सुनेच्या या कारणाम्याची कुनकुन लागली असता सुनेचा माग काढत तिच्या मागे गेली ती सुन प्रियकराबरोबर राहुरीच्या यात्रेत येऊन धडकली सुन तिच्या प्रियकराबरोबर राहाट पाळण्यात बसत असताना सासूने रंगेहाथ पकडत सुनेच्या प्रियकराच्या कानशिलात लगावली तर सुनेचे केस पकडत खाली पाडुन मातीत लोळवत चांगलीच धुलाई केली.

तत्काळ यात्रेच्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस प्रशासनाने व महिला पोलिसांनी धाव घेत सासु सुनेचा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला असता सासूने सुनेचे केस घट्ट धरल्याने पोलिसांचीही वाद सोडवण्यासाठी काही काळ दमछाक झाली सासूचा राग इतका अनावर झाला की सुनेला चोप देतच होती. अखेर सुनाने सासूच्या तावडीतून कशीबशी सुटका करत यात्रेतून गर्दीमध्ये पळ काढत आपली सासू च्या तावडीतून सुटका करून घेतली.

तर राहुरी शहरातील मल्हारवाडी रोड परिसरातील एक विवाहित तरुण या भागातील च प्रियसी बरोबर यात्रेतील राहाट पाळण्यात बसण्याच्या तयारीत असताना त्या विवाहित तरुणाची पत्नी राहाट पाळण्यात बसण्याच्या ठिकाणी येताच पतीच्या प्रियसिची आपल्या प्रियकराची पत्नी‌ समोर पाहताच पाचवर धारण बसली आपल्या पती बरोबर दुसरी बाई पाहताच तिने ‌‌रुद्ररुप धारण करत शिव्या च्या लाखोली वाहत पतीच्या प्रियसीला चोप देण्यास सुरुवात केली.

ती प्रियसी मार वाचविण्यासाठी प्रियकराच्या मागे लपत होती तर मग पतीने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली असता तो पर्यंत बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलिस पथक आले अन् पत्नीच्या तावडीतुन पतीच्या प्रियसीला सोडवले या नंतर प्रियसिने गर्दीतून धुम ठोकली. पत्नीची पतीच्या तावडीतुन पोलिसांनी सुटका केल्याने अखेर वादावर पांघरुण पडले.

काही प्रेम प्रकरण करणार्यांना यात्रेत आनंद घेण्यात यश‌ आले‌ तर काहींच्या मनसुब्यांना पाणी फिरले.

मात्र राहुरीच्या यात्रेत सुनेची सासूने केलेली धुलाई तर पत्नीने पतीच्या प्रियसिला दिलेला चोप यांची विनोदी चर्चा होत आहे.