चाइल्ड करिअर इंग्लिश स्कूलचा" घे भरारी " सांस्कृतिक महोत्सव लक्षवेधी ठरणार.

चाइल्ड करिअर इंग्लिश स्कूलचा" घे भरारी " सांस्कृतिक महोत्सव लक्षवेधी ठरणार.

चाईल्ड करीअर चा *घे भरारी* सांस्कृतिक महोत्सव लक्षवेधी ठरणार

            नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील चाईल्ड करीअर इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चे यंदाचा ' घे भरारी' हा सांस्कृतिक महोत्सव शनिवार दिनांक ४ मार्च रोजी सायं.४वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सागर बनसोडे सर यांनी दिली.

                या स्नेहसंमेलन कार्यक्रमाची जोरदार पूर्वतयारी सुरू असून यंदाचा घे भरारी हा सांस्कृतिक महोत्सव लक्षवेधी ठरणार असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

              कार्यक्रमाचे जोरदार इव्हेंट मॅनेजमेंट सुरू असून सदरच्या कार्यक्रमात पहाडी आवाजातील धमाकेदार व बहारदार निवेदन,भव्यदिव्य रंगमंच, लखलखते लाईट डेकोरेशन,सुंदर रांगोळ्या, बलून डेकोरेशन, डिजे सिस्टीम सह विविध नृत्याविष्कार,मराठी,हिंदी गितांसह , कोलिगित,बैलगाडा शर्यत गीत, शेतकरी गीत, नाटिका, व लावणीसह वारकरी गीतांचा लक्ष वेधून घेणारा नृत्याविषकारची पर्वणी असणार आहे.त्यामुळे यंदाचा चाईल्ड करीअर इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चा घे भरारी हा सांस्कृतिक महोत्सव व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम लक्ष वेधी ठरणार आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृंद परिश्रम घेत आ

हेत.