नेवासा तालुक्यातील माका येथिल महाविद्यालयात मराठी भाषा दिवस साजरा.
*माका महाविद्यालयात मराठी भाषादिन साजरा*
माका :- नेवासा तालुक्यातील मुळा एज्युकेशन सोसायटीचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय माका येथे कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमत्त मराठी राज भाषा दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. दत्ता कोकाटे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख हिंदी विभाग प्रमुख प्रा. अमोल दहातोंडे यांनी करून दिली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माका येथील ज्येष्ठ पत्रकार श्री. आदिनाथ म्हस्के व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. लक्ष्मण आबा पांढरे संचालक मुळा सहकारी साखर कारखाना सोनई हे होते.
कार्यक्रम प्रसंगी बोलताना जेष्ठ पत्रकार आदिनाथ म्हस्के म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगावा व दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचाच वापर करावा . विद्यार्थ्यांनी महाविद्यालय स्तरावर मराठी भाषेचे तसेच सामाजिक जडणघडणीमध्ये मराठीचे खुप मोठे योगदान असुन भाषा आत्मसात करून विविध साहित्य निर्मिती मध्ये आवड निर्माण करून आपले जीवन फुलवावे. कुसुमाग्रज यांच्या विविध कविता संग्रह, कथासंग्रह, बालसाहित्य लघपट, नाटक याविषयी माहिती दिली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भानुदास चोपडे उपस्थित याप्रसंगी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे आपल्या जीवनातील महत्त्व समजावून सांगितले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. आरती खाडे हिने केले तर आभार प्रदर्शन तेजस गव्हाणे याने केले. कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच सर्व प्राध्यापक उपस्थित होते.