भटक्यांची पंढरी म्हणून समजली जाणारी मढी. कानिफनाथ यात्रा उत्सवानिमित्त गजबजली.

भटक्यांची पंढरी म्हणून समजली जाणारी मढी. कानिफनाथ यात्रा उत्सवानिमित्त गजबजली.
भटक्यांची पंढरी म्हणून समजली जाणारी मढी. कानिफनाथ यात्रा उत्सवानिमित्त गजबजली.

प्रतिनिधी :-अहमदनगर

महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आणि त्यातल्या त्यात नगर जिल्हा हा संत वास्तव्याने व्यापलेला आहे. नगर जिल्ह्यातील मढी येथे नाथपंथातील नवनाथांपैकी एक असलेले कानिफनाथ यांची संजीवन समाधी आहे.

        होळी पासून सुरुवात होणाऱा यात्रा उत्सव गुढीपाडव्या पर्यंत चालतो. गोपाळ समाजाला होळी पेटवण्याचा मान असतो.यात्रेनिमित्त महाराष्ट्रभर पसरलेले भटक्या समाजाचे लोक या यात्रेनिमित्त एकत्र येतात. यामध्ये गोपाळ, वैदू कैकाडी, कोलाटी ,कुंभार, घिसाडी लोहार, बेलदार, नंदीवाले, वासुदेव, मसनजोगी, गारुडी, डोंबारी, कहार, गाढव भोई, बहुरूपी, गोंधळी अशा विविध भटक्या जमातीचे लोक या ठिकाणी यात्रा उत्सवानिमित्त एकत्र येतात. वर्षभरात त्यांची या ठिकाणी भेट होत असते, त्यांचे आपसातील हितगुज, वाद-विवाद सोडवले जातात, सोइर संबंध जोपासली जातात. शासनाने जात पंचायतीला बंदी घातलेली असून प्रबोधनकारी जात पंचायत यानिमित्ताने होत असते. भटक्या विमुक्त जमातीतील सुशिक्षित तरुणांन मार्फत समाजातील मागासलेल्या घटकांना या ठिकाणी मार्गदर्शन करणारी प्रबोधनकारी जात पंचायत साकारली जाते.

         कानिफनाथ यात्रा उत्सव म्हणजे खऱ्या अर्थाने सामाजिक ऐक्याचे प्रतीक आहे. या निमित्ताने महाराष्ट्रातील अठरापगड जाती एकत्र येऊन हा यात्रा उत्सव साजरा करतात.

            यात्रेमध्ये मिठाई, खेळण्या, पूजेचे साहित्य, तमाशा, डोंबाऱ्याचा खेळ, गाढवांचा सर्वात मोठा बाजार या ठिकाणी साकारला जातो, कारण कष्टकरी समाजाचा गाढव म्हणजे एक उपजीविकेचे साधन असते,

     या यात्रेमुळे गावातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होत असले तरी वर्षानुवर्ष हे गावकरी या गोष्टीला सांभाळून घेत आहेत त्यामुळे मढीकरांचे सर्व भाविक भक्तांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येते.

         कैकडी' समाजाची काठी मानाची काठी म्हणून संबोधली जाते पहिला मान कळसाला काठी लावण्याचा 'कैकाडी 'समाजाचा असतो. त्याच बरोबर महाराष्ट्रातून वेगवेगळे जिल्ह्यातून वेगवेगळ्या तालुक्यातून दिंड्या व काठ्या यात्रेसाठी येतात या ठिकाणी वास्तव्यास राहतात अशी महाराष्ट्रातील भव्यदिव्य समजली जाणारी सर्वसामान्यांची यात्रा कोरोणाच्या दोन वर्षाच्या खंडानंतर मोठ्या उत्साहात पार पडत आहे.

          डफ खेळण्यासाठी मोठमोठाल्या यांची गर्दी यात्रा उत्सवात असते. अतिशय जल्लोषात वाजत-गाजत काठीची मिरवणूक होत असते.

            दक्षिणगंगा म्हणून समजले जाणारी गोदावरी नदी चे पाणी कावडी रूपाने भाविक भक्त घेऊन येत असतात. 

       अद्वितीय आशा यात्रा उत्सवाला संपूर्ण महाराष्ट्रभरातून लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी असते.

अनेक भाविक पंधरा दिवस वास्तव्यास असतात काही महिनाभरासाठी वास्तव्य करतात.

       त्यानंतर नाथ षष्ठी साठी पैठण येथे काही भाविक जात असतात.

         देवस्थान ट्रस्टकडून यात्रेसाठी नियोजन बद्ध कार्य प्रणाली तयार केलेली असून सर्व यात्रा शिस्तबद्ध अशा पद्धतीने सुरू आहे. 

   दूरवरून येणाऱ्या भाविकांची व्यवस्था ट्रस्ट मार्फत व्यवस्थित रित्या आखणी करून करण्यात आलेली आहे.

      यात्रा उत्सवाच्यानियोजन समितीमध्ये ट्रस्टचे अध्यक्ष संजय बाजीराव मरकड, उपाध्यक्ष सचिन हरिभाऊ गवारे,कोषाध्यक्ष (बबन)राधाकिसन अंबादास मरकड, सचिव विमल नवनाथ मरकड, सहसचिव अँड विश्वजीत बलभिमराव डोके, कार्याध्यक्ष डॉ विलास राऊसाहेब मरकड, विश्वस्त अर्जुन भगवानराव शिरसाठ, विश्वस्त अँड तानाजीराव रामचंद्र धसाळ, विश्वस्त रविंद्र बाबुराव आरोळे, विश्वस्त भाऊसाहेब जनार्धन मरकड, विश्वस्त शामराव आसश्राजी मरकड, व्यवस्थापक संजय मोहनराव मरकड आदी च्या मार्गदर्शनाखाली यात्रेचे नियोजन व आखणी करण्यात आलेली असून मोठ्या उत्साहात यात्रा उत्सव सुरू आहे.