कै.विलास बानकर इंग्लीश मिडियम स्कुल ब्राम्हणी.तसेच ज्ञानगंगा इंग्लीश मिडियम स्कुल डिग्रस येथे सर्पमित्र राहुल व समिर यांचे प्राण्यांविषयी व्याख्यान ...

कै.विलास बानकर इंग्लीश मिडियम स्कुल ब्राम्हणी.तसेच ज्ञानगंगा इंग्लीश मिडियम स्कुल डिग्रस येथे सर्पमित्र राहुल व समिर यांचे प्राण्यांविषयी व्याख्यान ...

विलास बाणकर इंग्लिश मिडीयम स्कूल ब्राम्हणी या ठिकाणी सर्पमित्र राहुल गायकवाड व समीर शेख यांनी नागपंचमी निमित्ताने सापाविषयी समज गैरसमज या विषयावर अतिशय माहितीपूर्ण असे व्याख्यान केले कार्यक्रमाला हायस्कूल च्या संस्थापक /मुख्याध्यापक श्रीमती अश्वीनी बनकर व सर्व शिक्षक वर्ग उपस्तित होता 2 तास चाललेल्या या कार्यक्रमात विध्यार्थी यांनी गायकवाड यांना खूप सारे मनात असलेले सापविषयीचे गैरसमज विचारून त्याची खरी माहिती जाणून घेतली

सर्पमित्र व्हायचं असेल तर काय केल पाहिजे? असा सवाल विद्यार्थी वर्गातून गायकवाड यांना विचारला असता अतिशय सुंदर उत्तर गायकवाड यांनी सांगितले कि सर्पमित्र व्हायचं असेल तर सर्वात आधी निसर्गावर जीवापाड प्रेम केल पाहिजे.

श्री राहुल गायकवाड हे वयाच्या १५ व्या वर्षापासून सर्पमित्र आहेत आज त्यांना १७ ते १८ वर्षे पासून ते विषारी बिनविषारी सर्प तसेच विविध जातीचे प्राणी पक्षी यांना ते मानवि वस्तीपासून निसर्गाच्या सानिध्यात जिथे त्यांच पालण पोषण चांगल्या रितिने होऊ शकते अशा ठिकाणी त्यांच विसर्जन करतात सध्या ते म.फु.कृ.विद्यापीठ राहुरी येथे कंत्राटी सुरक्षा सुपरवायझर म्हणून कार्यरत आहेत त्यांचे व्यक्तीमत्व अतिषय मनमिळावू बोलके व कधीही कुणाचा रागराग न करणारे असे आहे.

राहुल गायकवाड प्रमाणेच समिर शेख यांचे व्यक्तीमत्व आहे तेही म.फु.कृ.विद्यापीठ येथे कंत्राटी सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत .