जागतिक महिला दिनानिमित्त_लोणी पोलीस स्टेशन येथील महिलां भगिनींचा सत्कार.

          जगभरात ८ मार्च हा महिला दिवस म्हणुन उत्साहात साजरा केला जातो, तसेच महिला दिनानिमित्त वेगवेगळे उपक्रम देखील राबविले जातात, विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे, स्त्री म्हणजे त्याग, प्रेम, कणखरपणा आणि प्रेरणा, ती एक आई आहे, जी संपूर्ण आयुष्यभर आपल्या मुलांसाठी झटत असते, ती एक बहिण आहे, जी कायम आपल्या भावाच्या पाठीशी उभी असते. ती एक पत्नी आहे, जिला आपल्या जोडीदाराच्या सुख-दुःखाची चिंता असते. आणि ती एक मुलगी आहे, जिला कुटुंबासाठी काहीही करण्याची जिद्द असते.

          जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लोणी पोलीस स्टेशन येथे कर्तव्यावर असणाऱ्या भगिनिंशी यावेळी गप्पा मारल्या, त्यांच्याशी चर्चा करण्यात आली, तेव्हा एक स्री म्हणून पुरुष पोलिसांच्या तुलनेत कर्तव्या बरोबरच घरची जबाबदारी स्वीकारने हे देखील एक मोठं आव्हान असल्याचे चर्चा झाली.

          त्याच निमित्ताने लोणी पोलीस स्टेशन येथे कर्तव्यावर असणाऱ्या महिलां भगिनींचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी भारतीय दलीत महासंघातर्फे_हिनाताई उबाळे तसेच बजरंग दलातर्फे सागर राक्षे, दिनेश राकेचा, संकेत खर्डे, यज्ञ लोहार, सौरभ लहामघे, पप्पू गागरे, दत्ता डहाळे,  शुभम गडाख, सागर उबाळे उपस्थित होते, पत्रकार प्रसाद घोगरे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.