संघटितपणे मोटरपंप चोरी करणारी चौथी टोळी मुद्देमालासह राहुरी पोलिसांकडून जेरबंद .
प्रेस नोट
दिनांक 13/08/2024
*40,000/- रूपये किमतीच्या 4 इलेक्ट्रिक मोटार 4 आरोपीकडून जप्त* * *संघटितपणे मोटर पंप चोरी करणारी चौथी टोळी राहुरी पोलिसांकडून जेरबंद**
****संघटित गुन्हेगारी करिताचे भारतीय न्याय संहिता कलम 303(2)प्रमाणे राहुरी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे
***
दि.27/07/2024 चे सकाळी 10/00 वा. ते दि.01/08/2024 रोजी सकाळी 10/00 वा.चे दरम्यान म्हैसगाव गावचे शिवारातील मुळा धरणामधील गाळपेर क्षेत्रातील नामे 1)श्री ज्ञानदेव चांगदेव गुलदगड वय 39 वर्ष धंदा शेती रा.आग्रेवाडी तालुका राहुरी विहीरीमधील पाणबुडी मोटार तसेच श्री भाउ खेबा गुलदगड यांची पाच.एच.पीची पाणबुडी मोटार तसेच श्री रावसाहेब बाळासाहेब आग्रे यांची लक्ष्मी कंपनीची - पाच.एच.पीची पाणबुडी मोटार व 600 फुट पारस कंपनीची केबल, श्री धनंजय भाउसाहेब गागरे यांची पाच.एच.पीची पाणबुडी मोटारी व केबल अज्ञात इसमांनी चोरून नेल्याबाबत भारतीय न्याय संहीता कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान पोलीस निरीक्षक संजय ठेंगे राहुरी पोलीस स्टेशन यांना गोपनीय माहिती मिळाली की सदरची चोरी ही इसम नामे1)दादासाहेब उर्फ संदीप बाबासाहेब गागरे 2)सखाहरी रंगनाथ बर्डे 3)जालिंदर सूर्यभान बर्डे 4)आकाश कृष्णा बर्डे सर्व रा. म्हैसगाव ता. रा हुरी जिल्हा अहमदनगर यांनी केली. अशी माहिती मिळाल्या वरून सदर आरोपीस दिनांक 08/08/2024 रोजी अटक करून गुन्ह्याचे अनुषंगाने त्यांचेकडे चौकशी केली असता आरोपी मजकूर यांनी संघटित होऊन गुन्हा केल्याचे कबूल केल्याने सदर गुन्ह्यास भारतीय न्याय संहिता कलम 112 (2) हे कलम वाढवून मान्य न्यायालयापुढे हजर करून 6 दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली. पोलीस कस्टडी रिमांड घेण्यासाठी सरकारी अभियोक्ता श्री रवींद्र गागरे यांनी पोलिसातर्फे बाजू मांडली. पोलीस कस्टडी दरम्यान चोरलेल्या इलेक्ट्रिक पाण्याच्या 4 मोटारी आरोपीने काढून दिल्याने ते भारतीय साक्षाधिनियम 23(2) अन्वये तपासी अधिकारी पोना/रामनाथ सानप यांनी जप्त करून एकूण 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून गुन्ह्यात चोरी गेलेल्या उर्वरित मोटारींचा शोध चालू आहे
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबरमे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ, पोहेकॉ/खेमनर,पोना/रामनाथ सानप,पोहेकॉ/सय्यद शकुर, पोना/मोराळे,पोना/साखरे,पोकॉ/दुधाडे यांनी केली.