हर घर तिरंगा अभियानात सर्वांनी सहभाग घ्यावा - कुलगुरू डॉ . पी . जी . पाटील

हर घर तिरंगा अभियानात सर्वांनी सहभाग घ्यावा - कुलगुरू डॉ . पी . जी . पाटील

*हर घर तिरंगा अभियानात सर्वांनी सहभाग घ्यावा*

*- कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील*

*राहुरी विद्यापीठ, दि. 13 ऑगस्ट, 2024*

            भारतीय स्वातंत्र दिन 15 ऑगस्ट, 2024 रोजी संपूर्ण देशभर साजरा होत आहे. या अंतर्गत दि. 9 ते 15 ऑगस्ट, 2024 या कालावधीत हर घर तिरंगा हे अभियान राबविण्यात येत आहे. तरी सर्वांनी या हर घर तिरंगा अभियानात सहभाग घ्यावा असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.

            महात्मा फुले कृषि विद्यापीठातील पदव्युत्तर महाविद्यालयाच्या इमारतीसमोर कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी हर घर तिरंगा या अभियानांतर्गत तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचार्यांना तिरंगा प्रतिज्ञा दिली. याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, कुलसचिव श्री. अरुण आनंदकर, पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, प्रभारी नियंत्रक डॉ. बी.टी. पाटील, उपकुलसचिव प्रशासन श्री. विजय पाटील, सुरक्षा अधिकारी श्री. गोरक्ष शेटे, लेफ्ट. डॉ. सुनिल फुलसावंगे, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.