नेवासा तालुक्यातील प्रवरा संगम येथील धक्कादायक घटना दोन युवकांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून नदीच्या पुलावरून उडी घेतली .
नगर जिल्हा प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील प्रवरा संगम येथे धक्कादायक घटना समोर आली असून याबाबत सविस्तर वृत्तांत असा आहे की धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोरमारे आणि कोळसे अशा दोन व्यक्तींनी आपल्या चार चाकी मध्ये जलसमाधी घेत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली आहे .
चिठ्ठी वरील मजकुराच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाकडून शोध मोहीम सुरू असून अद्यापही संबंधित व्यक्तीबद्दल कुठलीही माहिती समोर आली नसल्याचे समजले आहे .
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला विभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील तहसीलदार संजय बिरादार , नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जाधव यांच्यासह पोलीस ताफा संबंधित व्यक्तींचा शोध घेत आहेत अशी माहिती सूत्रांकडून समजलेली आहे .