हिंदू सणांना सुट्ट्या नाकारल्याचा गुड शेफर्ड स्कूल प्रिन्सिपलवर आरोप.

हिंदू सणांना सुट्ट्या नाकारल्याचा गुड शेफर्ड स्कूल प्रिन्सिपलवर आरोप.

हिंदू सणांना सुट्ट्या नाकारल्याचा गुड शेफर्ड स्कूल प्रिन्सिपलवर आरोप.

प्रतिनिधी // प्रसाद घोगरे - 9370328644

श्रीरामपूर तालुक्यातील कडीत खुर्द येथे असलेल्या गुड शेफर्ड स्कूलचे प्रिन्सिपल सायमन जॉर्ज यांच्याविरोधात गावकरी व पालकांनी गंभीर तक्रारी केल्या आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षण धोरण व जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार सुट्ट्या देण्याऐवजी प्रिन्सिपल जाणीवपूर्वक नियमबाह्य वर्तन करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यांनी नवरात्र उत्सवाच्या दिवशी शाळांना सुट्टी जाहीर केली होती. परंतु, प्रिन्सिपल यांनी शाळा सुरू ठेवली आणि विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना हजर राहण्यास भाग पाडले. गावकऱ्यांच्या तक्रारीनंतर स्थानिक गटशिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत शाळेची पाहणी करण्यात आली असता, शाळा सुरू असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेचे व्हिडिओ आणि छायाचित्रे देखील घेतल्याचे सांगण्यात येते.

शिक्षणाधिकारी आल्याचे लक्षात येताच प्रिन्सिपल यांनी अचानक सुट्टी घोषित करून पालक व विद्यार्थ्यांची गैरसोय केली. याबाबत कारण विचारल्यास त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, अशी माहिती तक्रारदारांनी दिली आहे.

तक्रारदारांचा आरोप आहे की, प्रिन्सिपल यांचे काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांशी व विशिष्ट राजकीय संघटनांशी संबंध असून, तक्रार करणाऱ्यांवर दबाव आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. तसेच, हिंदू सणांना सुट्ट्या न देण्यामागे कोणत्या विचारसरणीशी संलग्नता आहे का, याचीही शंका व्यक्त करण्यात आली आहे.

तक्रारीत मागणी करण्यात आली आहे की, शाळेचे मागील तीन वर्षांचे विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे हजेरी रजिस्टर तपासण्यात यावे, प्रिन्सिपलचे संबंध कोणत्या संघटनांशी आहेत याची चौकशी व्हावी आणि नियमबाह्य कृत्याबद्दल कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.

या प्रकरणाची तक्रार नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे अधिकृतरीत्या दाखल करण्यात आली असून, चौकशीची मागणी जोर धरत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे..