बसमधील प्रवाशांची लूटमार करणाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेने दाखवला दणका,2,38,000/- रु .किंमतीच्या मुद्देमालासह महिला आरोपींची टोळी जेरबंद .

बसमधील प्रवाशांची लूटमार करणाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेने दाखवला दणका,2,38,000/- रु .किंमतीच्या मुद्देमालासह महिला आरोपींची टोळी जेरबंद .

बसमध्ये प्रवाशांचे दागिने व रोख रकमेची चोरी करणारी महिला आरोपींची टोळी 2,38,000/- रुपये किमतीचे मुद्देमालासह जेरबंद, 

स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगरची कारवाई.

 

              प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी नामे रुपेश रोहिदास गायकवाड वय 32 वर्षे, रा. काळकुप, ता. पारनेर, जि. अहमदनगर हे दिनांक 22/05/2023 रोजी तारकपुर बस स्टँड अहमदनगर येथुन आळेफाटा या ठिकाणी जाणेकरीता बस मध्ये चढत असतांना कोणीतरी अज्ञात आरोपींनी त्यांच्या गळ्यातील 30,000/- रुपये किमतीची 10 ग्रॅम वजनाची सोन्याचे चैन चोरुन नेली होती. सदर घटने बाबत तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. 776/2023 भादवि कलम 379 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

          अहमदनगर जिल्ह्यामध्ये बस स्टँडवर चोरीच्या घटना घडत असल्याने राकेश ओला , पोलीस अधिक्षक अहमदनगर यांनी पोनि/ दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना गुन्हे उघडकीस आणणेबाबत विशेष पथक नेमुण कारवाई करणे बाबत आदेश दिले होते. नमुद आदेशा प्रमाणे पोनि/दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ/सुनिल चव्हाण, संदीप पवार, अतुल लोटके, पोना/रविंद्र कर्डीले, संतोष खैरे, पोकॉ/भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, मेघराज कोल्हे, मपोकॉ/सोनाली साठे अशा पोलीस अंमलदार यांचे पथक नेमुण ना उघड गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणे बाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले. 

           स्था.गु .शा.चे वरील पथक दिनांक 18/12/2023 रोजी अहमदनगर शहरामधील बस स्टँडवरील सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक करुन आरोपींची माहिती घेत असतांना पोनि/ दिनेश आहेर स्था.गु.शा. अहमदनगर यांना गुप्त बातमीदारामार्फत तीन महिला तारकपुर बस स्टँड या ठिकाणी चोरी केलेले सोन्याचे दागिने घेवुन येणार असलेबाबत माहिती मिळाली. त्यावेळी पोनि/ दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले. पोलीस पथकाने तारकपुर बस स्टँड अहमदनगर या ठिकाणी जावुन सापळा रचुन थांबले असता तारकपुर बस स्टँड या ठिकाणी तीन महिला संशयीतरित्या थांबलेल्या दिसुन आल्या. पोलीस पथकास त्यांचा संशय आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 1) छाया किसन भोसले वय 50 वर्षे, रा. माळीवाडा, ता. जि. अहमदनगर, 2) जमुना संदीप काळे वय 26 वर्षे, रा. वाकी, ता. आष्टी, जि. बीड, 3) शितल आदिनाथ भोसले वय 22 वर्षे, रा. हातवळण, ता. आष्टी, जि. बीड असे असल्याचे सांगितले आहे. 

 

            सदर महिलांची माहिला पोलीस अंमलदार यांचे मार्फत झडती घेता त्यांचेजवळ असलेल्या पिशव्यामध्ये 2,38,000/- रुपये त्यामध्ये सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे मिळुन आले. सदर महिलांना त्यांचेकडील रोख रक्कम व दागिण्याबाबत विचारपुस करता त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा, जामखेड, पारनेर येथील बसस्थानकामध्ये गर्दीचा फायदा घेवुन चोरी केलेले असलेबाबत सांगितले आहे. सदर महिला यांना पुढील तपासकामी तोफखाना पोलीस ठाणे या ठिकाणी हजर करण्यात आले असुन पुढील तपास तोफखाना पोलीस ठाणे करीत आहे. वरील महिला आरोपी यांचेकडुन अहमदनगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत केलेले गुन्हे उघडकीस करण्यात आलेले आहेत.

 

 

         सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला ,प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व अनिल कातकाडे , उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.