पाथर्डी भूमी अभिलेख कार्यालयात लाचखोरीचा आरोप; मोजणीची तारीख लवकर हवी असल्यास 10 हजारांची मागणी?*

*पाथर्डी भूमी अभिलेख कार्यालयात लाचखोरीचा आरोप; मोजणीची तारीख लवकर हवी असल्यास 10 हजारांची मागणी?*
*पाथर्डी, दि. 16 मे 2026*: पाथर्डी येथील उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांकडून मोजणीची तारीख लवकर मिळवण्यासाठी अतिरिक्त 10 हजार रुपये घेतले जात असल्याचा आरोप स्थानिक पातळीवर होत आहे.
`अहिल्यानगर लोकल` या सोशल मीडिया पेजने याबत पोस्ट करत म्हटले आहे की, जर तुमची पिळवणूक होत असेल किंवा कामासाठी अतिरिक्त पैसे मागितले जात असतील तर आम्हाला संपर्क करा. आम्ही तुमचा आवाज बनून मदमस्त झालेल्या अधिकाऱ्यांना जाब विचारू.
या आरोपामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट असून प्रशासनाने याची दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणी होत आहे.








