हनुमंत रुपी वानराचा बालाजी देडगाव येथे अकाली मृत्यू झाल्याने जड अंतकरणाने अंत्यसंस्कार.

हनुमंत रुपी  वानराचा बालाजी देडगाव येथे अकाली मृत्यू झाल्याने जड अंतकरणाने अंत्यसंस्कार.

   (प्रतिनिधी युनुस पठाण):- नेवासा तालुक्यात बालाजी देडगाव येथे अनेक दिवसापासून हनुमंतरायाचा वंशज वानर गावात मध्ये कार्यरत होता . अगदी मोठ्या गुण्यागोविंदाने देडगावकरांशी त्या वानराची नाळ जोडली होती. गावातील लोक त्याला खायला देत असे. अत्यंत गरीब स्वभावाचा असल्याने त्याने कुणालाही तकलीफ दिली नाही. म्हणून हनुमंताच्या रूपामध्ये त्याला बघून लोक त्याची दर्शन घेत सेवा करत होती.

    परंतु नियतीला काही वेगळंच मान्य असल्याने त्या वानराचे अकाली निधन झाले. परंतु त्या वानराला इकडे तिकडे त्याचे विसर्जन न करता टाळ मृदुंगाच्या गजरात व फटाक्याच्या आतषबाजी मध्ये त्याची गावभर ट्रॅक्टरमध्ये मोठी मिरवणूक ह भ प सुखदेव महाराज मुंगसे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. व ह भ प गवळी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हनुमान मंदिर परिसरात त्याचा धार्मिक पद्धतीने आरती ,हनुमान चालीसा व पारंपारिक पद्धतीचे पूजन करून ब्राह्मण देवाच्या वेद मंत्राच्या साह्याने त्याचा अंत्यविधी करण्यात आला.

     यावेळी बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ महाराज मुंगसे, विद्यमान सरपंच चंद्रकांत मुंगसे, भीमा मुंगसे ,विलास मुंगसे, ह भ प पांडुरंग महाराज रक्ताटे, नवनाथ महाराज तांबे, श्रीधर तिडके,शिवाजी महाराज तांबे, गणेश औटी, एडवोकेट कुणाल शिंदे,बंडू कुटे, बजरंग दलाचे उपाध्यक्ष शिवाजी काजळे , व्यवसायिक संघटनेचे अध्यक्ष किशोर मुंगसे,दत्तात्रय कदम, सचिन मुंगसे हनुमान भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     यावेळी जय श्रीराम जय श्रीराम तर हनुमंत राया की जय अशा घोषणा देत या हनुमंत राया रुपी वानराला जड अंतकरण वातावरणात निरोप देण्यात आला . देडगाव हे सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालणारे गाव असल्याने या अंत्यविधीसाठी सर्व जातीधर्म यांनी सहभाग घेतला होता.