मेजर करण काळे यांचा इंडियन आर्मी मध्ये निवडी बद्दल पावन महागणपती देवस्थान व ग्रामपंचायत च्या वतीने सन्मान.

मेजर करण काळे यांचा इंडियन आर्मी मध्ये निवडी बद्दल पावन महागणपती देवस्थान व ग्रामपंचायत च्या वतीने सन्मान.

*करण काळे यांची इंडियन आर्मी मध्ये निवड झाल्याबद्दल पावन महागणपती व ग्रामंचायत वतीने सन्मान*

         बालाजी देडगाव (प्रतिनिधी युनूस पठाण):- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील सेवा निवृत्त मेजर संजय काळे यांचे सुपुत्र करण संजय काळे यांची आत्ताच इंडियन आर्मी पदी निवड झाल्याबद्दल विविध संघटनेच्या शाखेच्या ग्रामपंचायत, पावन महागणपती देवस्थान , माजी विद्यार्थी संघ ,मोठा मित्रपरिवार तसेच हरित क्रांती कृषी सेवा केंद्र च्या वतीने भव्य सन्मान करण्यात आला.

         आत्ताच झालेल्या भरतीमध्ये करण काळे यांनी घवघवीत यश मिळवून आपल्या काळे परिवाराचा नव्हे तर गावाचा ,तालुक्याचा, जिल्ह्याचा अभिमान वाढवला आहे. अतिशय अल्पवयात ही नोकरीची संधी मिळाल्याने तालुक्यातून अभिनंदन आता वर्षाव होत आहे.

       चतुर्थी निमित्ताने पावन महागणपती देवस्थान येथे वडील व करण काळे यांचा दोघांचाही सन्मान करण्यात आला यावेळी देवस्थानचे अध्यक्ष संभाजीराव मुंगसे यांनी शुभेच्छा देताना सांगितले की करण हा मेजर याच परिसरात वाढला असून गणपती परिसरात त्याचा आतापर्यंतचा सराव झाला व गणपती ही विघ्नहर्ताची देवता असल्याने गणपती बाप्पाचा प्रसाद त्याला मिळाला आहे अशा शब्दात त्याचे अभिनंदन व कौतुक केले. त्यावेळी गणपती देवस्थानचे विश्वस्त ह भ प पांडुरंग महाराज रक्ताटे, बन्सी आप्पा मुंगसे , भाऊराव टांगळ,आदिनाथ कुटे,संजय मुंगसे, भाऊसाहेब मुंगसे,माळवदे महाराज आदी भाविक उपस्थित होते.

       यावेळी मेजर करण काळे याने माझा जो गावभर सन्मान झाला त्यांचा मी सर्वांचा ऋणी राहील व गावाचं नाव उज्वल करेल व माझ्यावर ग्रामस्थांनी भरभरून प्रेम केले आहे याचा मला मनस्वी आनंद होत आहे असे म्हणत सर्व ग्रामस्थांचे आभार मानले.

         ग्रामपंचायत च्या वतीनेही सरपंच चंद्रकांत मुंगसे ,उपसरपंच महादेव पुंड, माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे , माजी सरपंच लक्ष्मणराव गोयकर ,भारत कोकरे , आदि सदस्यांनी सन्मान करत नूतन कार्यास शुभेच्छा दिल्या.