सत्ता आल्यास बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी काँग्रेस आग्रही राहील --- डॉ. सुधीर तांबे
संगमनेर-- महाराष्ट्रातील अल्पसंख्याक आणि बहुजन समाजाची आर्थिक स्थिती सुधारली पाहिजे त्यांना मुख्य प्रवाहाचे लाभ मिळायला हवेत अन्याय अत्याचार यातून निर्माण झालेला असंतोष नष्ट व्हायला हवा ही काँग्रेस पक्षाची भूमिका असून सत्ता आल्यास बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी काँग्रेस आग्रही राहील असे प्रतिपादन मा.आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केले. भाऊसाहेब थोरात सहकारी शेतकी संघाच्या कार्यालयामध्ये नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या बैठकीस सेंट मेरी धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू रेव्ह फा.ज्यो गायकवाड, संत ईगनाथी चर्चचे रेव्ह फा. नेल्सन परेरा, रेव्ह फा.सतीश कदम, ज्येष्ठ पत्रकार सॉलोमन गायकवाड, ख्रिस्ती विकास परिषदेचे अध्यक्ष अनिल भोसले, प्रा. बाबा खरात, जिल्हाध्यक्ष दीपक कदम,अँड. किरण रोहम, लॉरेन्स गायकवाड, सुरेश गायकवाड, अमोल नाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. तांबे पुढे म्हणाले की, आर्थिक स्थितीच्या पार्श्वभूमीवरील दुर्बल घटक व्यावसायिकृत झाले पाहिजे याकरिता त्यांना योग्य संधी मिळायला हवी मानवतावाद आणि समन्यायित्व यावर काँग्रेस पक्षाचा विश्वास आहे. यासाठी समाजाने ही आपल्या ज्ञानकक्षा रुंदावल्या पाहिजेत आर्थिक स्तरावर उन्नत होण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे तर ख्रिस्ती समाज शैक्षणिक, आर्थिक, राजकीय दृष्ट्या आजही वंचित राहिलेला असून मदर तेरेसा आर्थिक विकास महामंडळाबरोबरच अनेक प्रलंबित प्रश्ना संदर्भात उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या जिल्हास्तरीय बैठकीमध्ये, फेडरी फर्नांडिस, अँड. सचिन बोरुडे, मार्कस बोर्डे, सनी गायकवाड, बिशप भाऊसाहेब नेटके, सिमोन रूपटक्के, कैलास भोसले, प्रभाकर चांदेकर, रमेश ओहोळ, विनोद गायकवाड, दिनकर यादव, अनुप कदम, अक्षय गायकवाड, अमोल गायकवाड, किरण बोर्डे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक सनी गायकवाड यांनी केले तर रेव्ह फा.गायकवाड यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.