कै. तात्याबा बनसोडे इंग्लिश स्कूल माका येथील बाल दिंडी मिरवणूक उत्साहात संपन्न.

कै. तात्याबा  बनसोडे इंग्लिश स्कूल माका येथील बाल दिंडी मिरवणूक उत्साहात संपन्न.

कै. तात्याबा बनसोडे इंग्लिश स्कूल ची बाल दिंडी मिरवणूक उत्सहात

             नेवासा तालुक्यातील माका येथील कै. तात्याबा बनसोडे इंग्लिश मिडीयम स्कूल चा देवशयनी आषाढी एकादशी निमित्त बाल दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता.सदर दिंडी सोहळ्यात विविध संत,व देव देवतांच्या वेशभूषेतील चिमुकले विद्यार्थी लक्ष वेधून घेत होते.अनेक विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज, सोपानकाका, निवृत्ती, मुक्ताबाई, जनाबाई, शिवशंकर पार्वती ,व वारकरी पोशाख परिधान केलेले चिमुकले बाल दिंडी सोहळा मध्ये प्रमुख आकर्षण ठरले. मृदुंग, टाळ गजराच्या निनादत माका बस स्टँड व गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. सदर दिंडी सोहळा मध्ये ग्रामस्थ, पालक, माता पालकांनी उत्स्पूर्तपणे सहभाग घेतला व चिमुकल्यांचा आनंद द्विगुणित केला.

          शाळा ही केवळ ज्ञान देणारी इमारत नसते,तर विद्यार्थ्यांवर संस्कार घडवणारे संस्कार केंद्र असते.म्हणूनच बाल वयातच मुलांवर अध्यात्मिक संस्कार व्हावेत या उद्देशाने या बाल दिंडी सोहळा चे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष सागर बनसोडे सर यांनी केले.

          हा दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी स्कूल चे प्राचार्य विशाल जैन, शिक्षक संदीप खाटीक ,संजय गरूटे,शिक्षिका श्रीमती सविता दराडे, श्रीमती काळे, अकांक्षा बेंद्रे, श्रीमती पटेकर, श्रीमती शिरसाठ, अशोक मगर, यांनी परिश्रम घे

तले.