वंजारवाडी शाळेचा "मिशन आपुलकी उपक्रम प्रा.संभाजी दराडे यांनी दिला शाळेस स्मार्ट एलईडी भेट

वंजारवाडी शाळेचा "मिशन आपुलकी  उपक्रम  प्रा.संभाजी दराडे यांनी दिला शाळेस स्मार्ट एलईडी भेट

खेडले परमानंद वार्ताहर : नेवासा तालुक्यातील वंजारवाडी येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने "मिशन आपुलकी" उपक्रम राबत आहे.या स्तुत उपक्रमाची 

 शाळेचे माजी विद्यार्थी व प्रा.संभाजी सोपानराव दराडे यांनी शाळेला 45 इंची एलईडी टीव्ही व स्टॅबिलायझर भेट दिला.

 

ग्रामस्थ कैलास आव्हाड, वासुदेव दराडे, बाळासाहेब दराडे, गोकुळदास दहिफळे,मच्छिंद्र डोळे,साहेबराव माळी, स्वाती दराडे, अनिता शिरसाट,श्रीमती साबळे मॅडम आदीसह शिक्षक,विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थितीत शाळेने हा एलईडी स्विकारला 

 शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. संभाजी दराडे म्हणाले की याच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकून प्राध्यापक झालेलो आहे.या शाळेप्रती ऋण व्यक्त करणे प्रत्येकाचे काम आहे .

समाजाच्या व देशाच्या विकासात शिक्षण हे प्रभावी साधन आहे. जिल्हा परिषद शाळा टिकल्या तर सर्व सामान्य व वंचित वर्गाला न्याय मिळेल. यासाठी गावातील शिक्षण प्रेमींनी पुढे आले पाहिजे. आजच्या स्पर्धेच्या काळात शाळेने विविध उपक्रम राबवून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत यासाठी गावातील नागरिकांनी सहकार्य करावे.तसेच गावाच्या विकासाबरोबर शैक्षणिक विकासही खूप महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 या उपक्रमाचे गटशिक्षण अधिकारी शिवाजी कराड व केंद्रप्रमुख योगेश महामिने यांनी कौतुक केले आहे.

 

कार्यक्रमाचे स्वागत मुख्याध्यापिका शारदा लोटके यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोनवणे मॅडम सूत्रसंचालन विठ्ठल चादघोडे तर आभार हरिशचंद्र जाधव यांनी मानले.

 

------------

प्रा संभाजी सोपानराव दराडे यांनी या अगोदरही भरघोस मदत केलेली आहे. वडील स्वर्गीय सोपानराव बाबुराव दराडे यांचे स्मरणार्थ इयत्ता सातवीच्या प्रथम येणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे 1111 रुपये विभागून रोख स्वरूपात बक्षीस देत आहे. 2021-22 मध्ये त्यांनी शाळेसाठी 11 हजार रुपये रोख देणगी दिली. 2022-23 मध्ये त्यांनी 5555 रुपयांची देणगी दिली. तसेच 15 ऑगस्ट रोजी दीड हजार रुपये दिलेले आहे.

-----------


-नेवासा तालुक्यातील वंजारवाडी येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला "मिशन आपुलकी" उपक्रम अंतर्गत प्रा.संभाजी दराडे यांनी दिलेली स्मार्ट एलईडी भेट घेताना मुख्याध्यापिका लोटके ,शिक्षक व उपस्थित ग्रामस्थ