सायबर अमिषाला बळी पडलेल्या नागरीकांना पोलिसांचा दिलासा : पोलिसांकडून ३,७०,००० रूपये.?

सायबर अमिषाला बळी पडलेल्या नागरीकांना पोलिसांचा दिलासा : पोलिसांकडून ३,७०,००० रूपये.?

सायबर अमिषाला बळी पडलेल्या नागरीकांना पोलिसांचा दिलासा : पोलिसांकडून ३,७०,००० रूपये.?

सातारा_प्रतिनिधी_प्रसाद घोगरे_९३७०३२८९४४.

सविस्तर_देशभरात सायबर अमिषाला बळी पडलेल्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, अशाच काही घटना पांचगणी पोलीस स्टेशन हद्दीत रहीवासी व पर्यटकांन सोबत घडल्याच्या तक्रारी दाखल होत्या, त्या अनुषंगाने पांचगणी पोलिसांनी सायबर गुन्हेगारांना वचक बसविण्यासाठी, सायबर तसेच गुन्हे प्रकटीकरण पथक पोलीस अंमलदार यांनी पांचगणी पोलीस ठाण्यात ऑनलाईन फसवणुक झालेल्या गुन्ह्यांचा तपास हाती घेतला होता.

पांचगणी पोलिसांनी वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गद्शनाखाल बुद्धी कौशल्याने व तांत्रिक माहीतीच्या आधारे पोलीस ठाणे हद्दीतील परीसर व आजुबाजुचे पोलीस ठाणे हद्दीतुन तसेच इतर जिल्यातुन शोध घेवुन एकुण ३,७०,०००/- रुपये ऑनलाईन फसवणुक झालेली रक्कम चे एकुण ४ अर्जाची चौकशी केली. व ऑनलाईन फसवणुक झालेली रक्कम चा शोध घेवुन ऑनलाईन फसवणुक झालेली रक्कम प्राप्त करण्यास सायबर तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकास यश प्राप्त झाले आहे. सदरील रक्कम पोलिसांनी फसवणुक झालेल्या नागरीकांना परत करण्यात आलेली आहेत.

सदर कामगीरी पोलीस अधीक्षक समीर शेख सातारा, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागिय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचीम, यांचे मार्गदर्शनाखाली पांचगणी पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार व सायबर तसेच गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल ७६२ उमेश रामचंद्र लोखंडे व पोलीस कॉन्स्टेबल ७०० अमोल धर्मु जगताप यांनी सहभाग घेतला आहे.

पांचगणी पोलिसांमार्फत सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, विविध लोन APP, अनोळखी Link, APK फाईल व अनोळखी फोनवरुन कॉल आलेस OTP बाबत माहीती देणेत येवु नये. अशा बाबतीत कोणतीही फसवणुक झालेस तात्काळ सायबर हेल्पलाईन नंबर 1930/1945 वर आपली तक्रार नोंद करुन पांचगणी पोलीस ठाणेस • संपर्क साधावा.