चांदा येथील दरोड्यातील आरोपींना पंधरा दिवसात न पकडल्यास घोडेगाव येथे रस्ता रोको आंदोलन.

चांदा येथील  दरोड्यातील आरोपींना पंधरा दिवसात न पकडल्यास घोडेगाव येथे रस्ता रोको आंदोलन.

नेवासा तालुक्यातील चांदा येथे दोन हत्या झाल्या , दरोड्याचे सत्र थांबता थांबेना,अवैध धंदे वाढले, त्या निषेधार्थ चांदा ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालय समोर निषेध सभा घेतली .

त्यामध्ये किरण जावळे बाबासाहेबांना शामराव पवार बाळासाहेब जावळे आदींनी भाषणे केली

मराठा महासंघाचे राज्य संपर्कप्रमुख तथा शेतकरी महासंघाचे राज्य अध्यक्ष संभाजीरावदहातोंडे यांनी चांदा परिसरातील खून दरोडे याचा तपास पोलीस नीटपणे करीत नसल्याचा निषेध केला राज्याचे गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांची मी भेट घेतली व चर्चा केलेली आहे . महाराष्ट्र शासनाकडे चांदा येथे स्वतंत्र पोलिस चौकीची मागणी आम्ही करीत आहोत असे दहातोंडे यांनी सांगितले.

पं.स.चे माजी सभापती कारभारीन जावळे आपल्या भाषणात म्हणाले की चांदा परिसरातील गुन्हेगारीचा तपास पोलिसांनी कसून करावा व गुन्हेगारीचा तपास पोलिसांनी कसून करावा गुन्हेगारांना कडक शासन मिळालेच पाहिजे. पा

यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ तुमच्या बरोबर आहोत पण तपास मात्र सखोल झाला पाहिजे असेही जावळे म्हणाले .

अशोकराव गायकवाड आपल्या भाषणात म्हणाले की चांदा परिसरात सर्व गुन्हेगारीचा व अवैध धंद्याचा पोलिसांनी बंदोबस्त करावा व सर्व आरोपींचा शोध लावावा आम्हाला रस्त्यावर उतरून जाब विचारायला लावू नका .

रात्रीची तुमची गाडी जर फिरते तर कुठे सांगा परिसरात कुठे कुठे फिरते ती गाडी येते का ?असे एक ना अनेक प्रश्न गायकवाड यांनी या प्रसंगी उपस्थित केले.

सोनई पोलिस स्टेशनचे स.पो.नि. सचिन बागुल आपल्या भाषणात म्हणाले की चांदा येथील ज्ञानदेव दहातोंडे यांचा खून झाला त्यातील एक आरोपी चाकू आणि सबळ पुराव्या सह आम्ही पकडला ओंकार कर्डिले यांचे घरी दरोडा व त्यांची दरोडेखोरांनी हत्या केली त्यातील सुद्धा एक आरोपी पुराव्यासह आम्ही पकडला दोन्ही गुन्ह्यातील व दरोडे प्रकरणातील गुन्हेगार सर्व पुराव्यानिशी लवकरच आम्ही तपास करू चांदा परिसरातील सर्व अवैध धंदे आणि बेकायदेशीर प्रकार गुन्हेगारी सोनई पोलीस स्टेशन पूर्णपणे बंद करील . अशी घोषणा त्यांनी केली .

सभेच्या शेवटी अशोकराव गायकवाड व सर्व ग्रामस्थांनी जाहीर घोषणा दिल्या चांदा येथे स्वतंत्र पोलिस स्टेशन झालेच पाहिजे या परिसरात खून दरोडे गुन्हेगारांचा तपास दोन आठवड्यात लागला नाही तर घोडेगावला चौकात रास्ता रोको व जेलभरो आंदोलन करू अशी सर्व ग्रामस्थांनी जंगी घोषणा देऊन जाहीर आव्हान केले . सभेसाठी प्रमुख्याने मुळा चे संचालक बाबुराव चौधरी जि.प. सदस्य अनिल राव अडसूरे तंटामुक्ती अध्यक्ष मोहन भगत प्रदीप भाऊ चौधरी ज्ञानेश्वर चे माजी संचालक ज्ञानदेव दहातोंडे, संजय भगत, प्रकाश कटारिया, विलास भालके, लक्ष्मण कर्डिले, मोहन राशिनकर, बाळासाहेब दहातोंडे, पोपटराव दहातोंडे, दीपक जावळे, शिवाजी दहातोंडे, बंडू दहातोंडे, सादिक शेख, संतोष गाढवे, नाथा जावळे, बाबासाहेब अल्हाट, हमीदभाई शेख, माऊली धाडगे आदी असंख्य ग्रामस्थ या शोक सभेसाठी उपस्थित होते

.