*नगर मनमाड महामार्गावर डिग्रस फाटा परिसरात भीषण अपघात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकिस्वार तरुणाचा जागीच मृत्य तर एक जण जखमी*

*नगर मनमाड महामार्गावर डिग्रस फाटा परिसरात भीषण अपघात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकिस्वार तरुणाचा जागीच मृत्य तर एक जण जखमी*

नगर–मनमाड महामार्गावरील अपघाताचे सत्र सुरूच असुन आज पुन्हा एकदा एकेरी वाहतुकीमुळे एका निष्पाप तरुणाचा बळी गेला असुन या रस्त्यावर प्रवास करणे दिवसेंदिवस धोकादायक ठरत आहे आज रविवार, २८ डिसेंबर रोजी दुपारी सुमारे साडे बारा वाजण्याच्या सुमारास डिग्रस फाटा परिसरात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा सहकारी जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नदीम आदम शेख वय १९ वर्ष व उमर अब्बास शेख दोघेही राहणार डिग्रस तालुका राहूरी हे दोघेही आपल्या दुचाकीवरून राहुरी येथून आपल्या घरी डिग्रसकडे येत असताना डिग्रस फाटा परिसरात त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात नदीम शेख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर उमर शेख हा तरुण जखमी झाला आहे. त्याच्यावर राहूरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत अपघाताची माहिती मिळताच डिग्रस येथील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोघांना राहुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नदीम आदम शेख यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध सुरू केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे डिग्रस परिसरात शोककळा पसरली असून नगर–मनमाड महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या घटनांबाबत नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त करण्यात येत आहे.