लव्ह जिहाद’च्या आरोपातून जावेद पठाण ची निर्घृण हत्या

लव्ह जिहाद’च्या आरोपातून जावेद पठाण ची निर्घृण हत्या

लव्ह जिहाद’च्या आरोपातून जावेद पठाण ची निर्घृण हत्या

मित्राच्या बहिणीशी प्रेमसंबंध ठरले कारण

पुणे | प्रतिनिधी : प्रसाद घोगरे (मो. 9370328944

मित्राच्याच बहिणीशी लव्ह जिहाद ( प्रेमसंबंध ) ठेवल्याच्या आणि तिला गावातून पुण्यात आणल्याच्या आरोपातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यातील आंबेगाव परिसरात घडली आहे. या घटनेनंतर ‘लव्ह जिहाद’चा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जावेद ख्वाजामियाँ पठाण (वय ३४, सध्या रा. नऱ्हेगाव, पुणे; मूळ रा. ख्वाजा नगर, भोकर, जि. नांदेड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणी संदीप रंगराव भुरके (वय २८, रा. भोकर, जि. नांदेड) आणि ओमकार गणेशराव किरकन (वय २४, रा. भोकर, जि. नांदेड) या दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिस तपासानुसार, जावेद आणि आरोपी संदीप हे एकाच गावातील रहिवासी होते. जावेदचे संदीपच्या बहिणीशी मागील चार ते पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते.
दोघांची घरे शेजारी असल्याने ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाल्याचे तपासात समोर आले आहे.

मात्र हा लव्ह जिहाद चां प्रकार असल्याने हे संबंध संदीप आणि त्याच्या कुटुंबीयांना मान्य नव्हते.
दरम्यान, जावेदने संबंधित तरुणीला नांदेड जिल्ह्यातील भोकर येथून पुण्यात आणून नऱ्हे परिसरात एकत्र राहण्यास सुरुवात केल्याने वाद अधिक चिघळला.

बहिण मुस्लिम तरुणासोबत लव्ह जिहाद च्या प्रकरणात फसून पळून गेल्याचा राग मनात धरून संदीप भुरके हा आपल्या साथीदारासह पुण्यात आला.

२२ डिसेंबर रोजी सायंकाळी आंबेगाव येथील गायमुख परिसरात आरोपींनी जावेदला गाठले. “बहिणीला गावातून पुण्यात का आणलेस?” लव्ह जिहाद करून तुम्हाला काय मिळते अशा कारणावरून वाद वाढला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपींनी जावेदवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. डोक्यावर आणि शरीराच्या इतर भागांवर गंभीर जखमा झाल्याने जावेद जागीच कोसळला.
जखमी अवस्थेत जावेद ला खासगी रुग्णालयात, व नंतर ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेनंतर ‘लव्ह जिहाद’च्या आरोपांवरून परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. नाव न सांगण्याच्या अटीवर एका हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्याने प्रतिक्रिया देताना सांगितले की, “आम्ही हत्येचे समर्थन करत नाही; मात्र लव्ह जिहादच्या घटनांबाबत समाजात तीव्र असंतोष आहे.” त्यातूनच जावेदची हत्या झाल्याचा मत त्यांनी आमच्याशी बोलतांना व्यक्त केले.

दरम्यान, आरोपी घटना घडताच नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे पळून गेले होते. आंबेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी विशेष पथक तयार करून CCTV फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे दोघांना शिताफीने ताब्यात घेतले.

पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि सहायक आयुक्त राहुल आवारे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. नागरिकांनी कायदा हातात न घेता शांतता राखावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.