अल्पवयीन मुली बरोबर बालविवाह करून लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास राहुरी पोलिसांनी ठोकल्या बेड्या .

अल्पवयीन मुली बरोबर बालविवाह करून लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास राहुरी पोलिसांनी ठोकल्या बेड्या .

अल्पवयीन मुली बरोबर बालविवाह करून लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस राहुरी पोलिसांकडून अटक करण्यात आली असून सदर आरोपीवर राहुरी पोलीस ठाणे येथे गु.र.क्र.943/24 us 376(2)(f) भारतीय न्याय संहिता rw us 6 पोक्सो कायदा अन्वये दिनांक 21 / 08 /2024 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

  

            सदर गुन्ह्याची थोडक्यात हकीगत अशी की, अल्पवयीन मुलगी हिस त्याच्या परिचयातील विश्वस्त याने सुखी संसाराचे प्रलोभान देऊन तिच्याशी बालविवाह करून शारीरिक संबंध ठेवले व ही बाब लपवून ठेवली. सदरच्या बालविवाह संबंधातून सदर अल्पवयीन मुलगी ही गरोदर झाली व तिने एका बाळाला जन्म दिला त्यावरून सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    

         सदर गुन्ह्यात आरोपी याचा राहुरी पोलिसांकडून शोध चालू होता. त्यास PSI खोंडे, Hc प्रविण खंडागळे, PC इफ्तिखार सय्यद यांनी आरोपीस पकडून सदर गुन्ह्यात दिनांक 23/08 /2024 रोजी अटक करण्यात आली असून आरोपी हा सध्या दिनांक 26 /08 /2024 पर्यंत पोलीस कोठडीत आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे हे करत आहेत.

 

 

           सदर गुन्ह्याचां तपास पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलूबर्मे, पोलीस उपविभागीय अधिकारी बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे नेतृत्वात PSI खोंडे, Hc प्रविण खंडागळे, PC इफ्तिखार सय्यद हे करत आहे.

 

 

          *राहुरी पोलिस्टेशन तर्फे नागरिकांना व पालकांना आवाहन करण्यात आले आहे की, आपले मुलं मुली हे कोणासोबत राहतात, खेळतात, फिरतात यावर जागरूकतेने लक्ष ठेवले पाहिजे. ते कोणाच्या आमिषाला, भूलथापांना बळी पडणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. तसेच त्यांना शाळेत व घरी गुड टच, बॅड टच याचे शिक्षण मार्गदर्शन केले पाहिजे*.

 

 

           *तसेच राहुरी गटविकास अधिकारी यांना व प्रत्येक गावातील ग्रामसेवक यांचे मार्फत आव्हान करण्यात येते की, बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये ग्रामसेवक हा सदर गावचा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून शासनाकडून नियुक्त असतो. त्यांनी आपल्या गावात जनजागृती करून बालविवाह होणार नाहीत व त्यातून कुठलीही अल्पवयीन मुलगी गरोदर राहणार नाही याची काळजी घेऊन आपापल्या स्तरावर जनजागृती करावी. असे आपल्याला आढळून आल्यास आपण स्वतः योग्य कारवाई करून राहुरी पोलीस ठाणे येथे घडलेल्या गुन्ह्याची फिर्याद द्यावी*