अखंड हरिनाम सप्ताह कोकरे वस्ती येथे ह भ प लक्ष्मण महाराज ब्राह्मणे यांची हरिनामाच्या गजरात कीर्तन रुपी सेवा संपन्न .

बालाजी देडगाव:-  (प्रतिनिधी युनूस पठाण )नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे कोकरे वस्ती येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन गेल्या 29 वर्षापासून चालत आहे. दररोज नामांकित महाराजांची किर्तन रुपी सेवा या निमित्ताने होत आहे. या कीर्तनाचा अनेक भाविक मोठ्या संख्येने लाभ घेत आहेत.

        या निमित्ताने चौथ्या दिवशी ह भ प लक्ष्मण महाराज ब्राह्मणे धावन वाडी यांची कीर्तन रुपी सेवा झाली या निमित्ताने सदा सज्जनाची संगती घडो या चरणावर त्यांनी आपल्या अमृतमय वाणीतून किर्तन रुपी सेवा दिली व श्रोत्यांनीही अगदी शांत मनाने ही कीर्तन सेवा श्रवण केली.

            या पंचम सप्ताह निमित्ताने दररोज अन्नदानाचे नियोजन करण्यात येत आहे. तरी भाविकांनी या अखंड हरिनाम सप्ताहाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा .हे आवाहन करण्यात आले आहे.