मराठा समाजाच्या वतीने मंगळवार दि.५ रोजी राहुरीत चक्काजाम आंदोलन.
मराठा समाजाच्या वतीने मंगळवार दि.५ रोजी राहुरीत चक्काजाम आंदोलन.
(राहुरी प्रतिनिधी) –शुक्रवार दि.१ सप्टेंबर २०२३ रोजी अंतरवली जि.जालना येथे मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण या विषयास अनुसरून शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू होते.परंतु हे आंदोलन चिरडण्याच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाने आंदोलनात सहभागी झालेल्या लहान मुले,महिला,वयोवृद्ध यांच्यावर अमानुष लाठी हल्ला करून हवेत अश्रुधूर सोडून सामाजिक वातावरण दुषित केले,या विषयास अनुसरून मराठा एकीकरण समिती राहुरी तालुक्याची बैठक खंडोबा मंदिर राहुरी येथे घेण्यात आली.
या सर्व घटनेचा सरकारने सखोल चौकशी करून जेकोणी दोषी असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी व मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे या मागणी साठी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती समोर नगर मनमाड रोडवर मंगळवार दि.५ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० मी. वा.चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे. अशा आशयाचे पत्र
या आंदोलनात राहुरी तालुक्यातील मराठा बांधवांनी सहभाग नोंदविण्याचे अवाहन मराठा एकीकरण समिती राहुरी तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.
या बैठकीस मराठा एकीकरण समितीचे देवेंद्र लांबे,रवींद्र मोरे,सतीष घुले,सचिन म्हसे,राजेंद्र लबडे,अशोक तनपुरे,मच्छिंद्र गुंड,अनिल आढाव,धनंजय देशमुख,ज्ञानेश्वर सप्रे,दिनेश झावरे,मधुकर घाडगे,रोहित नालकर,बलराज पाटील, महेंद्र उगले,सुजय काळे,अविनाश क्षीरसागर,अशोक कदम,मयुर कल्हापुरे,सचिन शेळके,शरद तनपुरे,अमोल डौले,सचिन लांबे,महेश गटकळ,अमोल लांबे,विकास लांबे,ज्ञानेश्वर धसाल,माधव लांबे,सुनिल इंगळे,भास्कर मंचरे,मधुकर गागरे,मधुकर सिनारे,उद्धव गागरे आदी उपस्थित होते.
मराठा एकीकरण समितीच्या बैठकीत आंदोलन करण्याविषयी सदस्य यांची चर्चा झाली.राहुरी शहरात विविध सभामुळे सातत्याने व्यापरी पेठ बंद रहात आहे.या बंद मुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे,त्यामुळे मराठा आंदोलना दरम्यान राहुरी शहर बंद न करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.*