भारतीय जनता पार्टीच्या नेवासा तालुका उपाध्यक्षपदी आकाश चेडे यांची निवड.

भारतीय जनता पार्टीच्या नेवासा तालुका उपाध्यक्षपदी आकाश चेडे यांची निवड.

(प्रतिनिधी युनूस पठाण)

अहिल्यानगर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी नेवासा भाजपा कार्यकारणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील ,प्रदेश सरचिटणीस विजयजी चौधरी ,प्रदेश कार्यालय प्रभारी उत्तर महाराष्ट्र विभाग संघटन मंत्री रवीजी आनासपुरे, मा. खासदार सुजयदादा विखे पाटील, आमदार विठ्ठलरावजी लंघे साहेब ,भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भाऊ दिनकर या सर्व वरिष्ठांच्या आदेशानुसार नेवासा भाजपा दक्षिण विभाग मंडळ अध्यक्ष प्रताप चिंधे व संभाजीराजे जगताप यांनी नेवासा तालुका उपाध्यक्षपदी आकाश अशोक चेडे यांची निवड केली.

      यावेळी नूतन उपाध्यक्ष आकाश चेडे यांनी पटली की माझ्यावर पक्षाने दिलेली कामगिरी मी निर्भीडपणे पेलवेन नेवासा तालुक्यात भाजप पक्ष वाढीसाठी काम करेल व सर्व भाजपा अधिकाऱ्यांना सोबत घेऊन तालुक्याचा विकास करण्याचा मानस व्यक्त केला. व वरिष्ठ कार्यकारिणीचे स्वागत करत अभिनंदन केले.

      या निवडीबद्दल विविध शाखेच्या संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी सरपंच चंद्रकांत मुंगसे, बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे, उपसरपंच बाळासाहेब मुंगसे, बळीराज्य संघटनेचे संस्थापक तथा विठ्ठलराव लंघे यांचे खंदे कार्यकर्ते मच्छिंद्र मुंगसे, सोसायटीचे माजी चेअरमन आदर्श शिक्षक खंडेश्वर कोकरे,सोसायटीचे व्हाईस चेअरमन जनार्धन देशमुख ,अशोक पाटील मुंगसे ,गणपती देवस्थानचे विश्वस्त अशोक मुंगसे, गणपती देवस्थान विश्वस्त भाऊसाहेब मुंगसे, विश्वास हिवाळे, भीमा मुंगसे, चांगदेव टकले, गोकुळ वांढेकर, शुभम दीक्षित, हरिभाऊ देशमुख, शिवाजी महाराज मुंगसे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके,आदिनाथ कदम, महेश चेडे, अमित चेडे, मयूर चेडे, योगेश चेडे, विशाल होंडे, योगेश खैरे,आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  सर्व मान्यवरांचे नूतन उपाध्यक्ष आकाश चेडे यांनी आभार मानले.