सोनई आरोग्य केंद्रात चालणाऱ्या निष्काळजी कारभाराचा भांडाफोड,आरोग्य केंद्र बनले घातकी केंद्र .
सोनई आरोग्य केंद्रात चालणाऱ्या निष्काळजी कारभाराचा भांडाफोड.
चुकीच्या लॅब रिपोर्ट मुळे रुग्ण धास्तावला .
हजारो लोकांच्या आरोग्याशी निगडित असलेले सोनई आरोग्य केंद्र बनले घातकी .
घटनेसंबंधी सविस्तर वृत्तांत असा आहे की सोनई प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्त चेक करण्यासाठी दिले असता ,रिपोर्ट मध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाजवीपेक्षा जास्त दाखवण्यात आले त्यामुळे संबंधित रुग्ण अक्षरशा धास्ताउन गेला व त्याने अहमदनगर येथील एका एमडी पॅथॉलॉजिकल लॅब मध्ये तपासणी केली असता सर्व काही नॉर्मल असल्याचे निष्पन्न झाले.
यासंबंधी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी कसबे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देत आम्ही रक्त तपासणीसाठी नगरला पाठवतो व त्या ठिकाणी ते रक्त खाजगी कंत्राटी स्वरूपात असलेल्या प्रयोगशाळेत तपासले जाते अशी प्रतिक्रिया दिली.
परंतु प्राप्त झालेले रिपोर्टची शहानिशा करणे हे आरोग्य अधिकाऱ्याचे काम आहे .प्रकरण अंगाशी येताना पाहून जो तो आपापली जबाबदारी झटकून मोकळा होतो . मी नाही त्यातली अन कडी लाव आतली अशी परिस्थिती उद्भवल्यामुळे मी निर्दोष कसा आणि समोरचा दोषी कसा हे दाखवण्याचाच अधिकारी प्रयत्न करतात .त्यामुळे सर्वतोपरी आरोग्य अधिकारीच जबाबदार असल्याचे निष्पन्न होत असतांना संबंधित घटनेची उच्चस्तरीय तपासणी करून संबंधित अधिकाऱ्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी रुग्नाची , नातेवाईकाची तसेच ग्रामस्थांनीही मागणी केली आहे .