हंडी निमगावमध्ये कृषिदूतांचे आगमन, ग्रामस्थानी केले जल्लोषात स्वागत .
*हंडीनिमगावमध्ये कृषिदूतांचे आगमन*
महात्मा फुले कृषि विद्यापीठ संलग्न मुळा एज्युकेशन सोसायटीच्या सोनई येथील कृषि महाविद्यालयाच्या कृषिदूतांचे नेवासा तालुक्यातील हंडीनिमगाव येथे ग्रामस्थांनी स्वागत केले .दहा आठवडे चालणाऱ्या या कार्यक्रमात कृषिदूत शेतकऱ्यांना शेतीविषयक आधुनिक कृषि तंत्रज्ञानाची माहिती देणार आहेत.
सरपंच भिवाजी आघाव, किरण आघाव, ग्रामविकास अधिकारी चित्रा भोगे, त्रिवेणीश्वर देवस्थानाचे महंत रमेशानंदगिरीजी महाराज, श्रीराम सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब साळुंखे, आदींसह गावकऱ्यांनी कृषिदूतांचे स्वागत केले. गावामध्ये सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, त्यांचे जीवनमान, सामाजिक आर्थिक स्तर, साक्षरतेचे प्रमाण, संबंधित गावातील पीक पद्धती, नैसर्गिक संसाधने अशा विविध गोष्टींचा अभ्यास केला जाणार आहे. शेतकऱ्यांना माती पाणी परीक्षण, विविध पिकांवरील रोग किडींचे व्यवस्थापन कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेल्या नवीन तंत्रज्ञानाबद्दल कृषिदूत माहिती देणार आहेत.
प्राचार्य डॉ. एच.जी. मोरे उपप्राचार्य एस.व्ही.बोरुडे कार्यक्रम समन्वयक ए.ए. दरंदले, कार्यक्रम अधिकारी प्रा. जे एम वाघमारे, प्रा. आर एस. गोंधळी प्रा. आर.टी. दिघे इतर विशेषज्ञ यांचे मार्गदर्शन लाभणार आहे अशी माहिती कृषिदूतांनी दिली.यावेळी कृषिदूत प्रणव पाचारणे, सुमित निकुम, तेजस शेळके, कौस्तुभ वाडीले उज्वल पाटील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.