सोनई प्रकरणाला नवे वळण - काही स्वयंघोषित सेटलमेंट नेत्यांचा हा खोडसाळ पना.

सोनई प्रकरणाला नवे वळण - काही स्वयंघोषित सेटलमेंट नेत्यांचा हा खोडसाळ पना.

सोनई प्रकरणाला नवे वळण - काही स्वयंघोषित सेटलमेंट नेत्यांचा हा खोडसाळ पना.

अहिल्यांनगर प्रतिनिधी : प्रसाद घोगरे..

सोनई प्रकरणात आता नवे वळण आले असून, मातंग समाजाचे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत काळोखे यांनी या प्रकरणावर ठाम भूमिका घेत जातीय राजकारणाचा मुखवटा फाडला आहे.

जाधव यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “हे हिंदू समाजातील दोन गटातील वाद विकोपाला जाऊन, गैरसमजुतीतून घडलेला प्रकार आहे, यात हिंदू - दलीत असा कोणताही प्रकार घडलेला नसून,  काही अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या तथाकथित, सेटलमेंट, स्वयंघोषित नेत्यांनी प्रसिद्धीसाठी आणि राजकीय फायद्यासाठी या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा खोडसाळ प्रयत्न केला आहे.”

ते म्हणाले, “वैयक्तिक कारणांमुळे हे भांडण टोकाला गेले. मात्र, त्याचा गैरफायदा घेत काही स्वार्थी आणि बनावट नेत्यांनी, हिंदू समाजात फूट पाडण्याचा कुटील डाव रचला आहे. हे लोक पीडित कुटुंबासाठी नव्हे, तर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी माकड उड्या मारत आहेत.”

काळोखे यांनी सांगितले की, “अरनगावमध्ये एका दलित युवकाची निर्घृण हत्या झाली आहे, तिकडे ते फिरकले देखील नाहीत, त्यावर ह्या नेत्यांनी तोंड देखील उघडले नाही. पण आज सोनई प्रकरणात जातीय तणाव निर्माण करण्यासाठी हेच नेते रांग लावत. मग हा सगळा प्रकार जातीय राजकारणाचा कुटील डाव नाही का, असा प्रश्न उपस्थित होतो.”

ते पुढे म्हणाले, “हिंदुत्ववादी संघटनांचा या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही. काही तथाकथित सेटलमेंट नेते आणि राजकीय स्वार्थी लोकांनी ‘हिंदुत्व’ या नावावर चिखलफेक करून समाजात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. हा खोडसाळ आणि पांगळा स्टंट असून आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध करतो.”

काळोखे यांनी ठामपणे म्हटले की, “आम्ही सुरुवातीपासून पीडित कुटुंबाच्या संपर्कात आहोत. हिंदू मातंग समाज त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असून, आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावी, पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, आर्थिक मदत मिळावी, ही आमची प्रमुख मागणी आहे. तसेच वातावरण दूषित करणाऱ्या स्वयंघोषित नेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही पोलिस प्रशासनाकडे करत आहोत.”

शेवटी त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, “हिंदुत्वाशी वाकड असलेलेच काही लोक हे प्रकरनाचं भांडवल करून दोन समाजांमध्ये तणाव निर्माण करत आहेत. पोलिस प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून समाजात फूट पाडणाऱ्या या कारस्थानांचा पर्दाफाश करावा, व पिडीत कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी केली असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.