घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा संपन्न.
मा ना गुलाबराव पाटील यांच्या हस्ते घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा संपन्न. नऊ कोटी 35 लाख रुपये खर्चून हे रुग्णालय उभारण्यात आले.पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला. यावेळी
ना. शंकरराव गडाख , खासदार सदाशिव लोखंडे , जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे, जिल्हा परिषद सदस्य सुनिल गडाख, तहसीलदार रुपेश कुमार सुराणा, प्रांताधिकारी, त्याचप्रमाणे अनेक बड्या नेत्यांची उपस्थिती होती त्याचबरोबर पंचक्रोशीतील नागरिक व शिवसैनिकांनी या कार्यक्रमाला मोठा सहभाग नोंदवला.
तीस खाटांची व्यवस्था असलेल्या अनेक आरोग्य सुविधांनी युक्त घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालय परिसरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी वरदान ठरणार यात शंका नाही असे वक्तव्य नामदार गुलाबराव पाटील यांनी केले.
या लोकार्पण सोहळ्याच्या वेळी घोडे गावकऱ्यांसाठी त्यांनी एक विशेष मोलाची भेट दिली 44 कोटींची पाणी योजना घोडेगाव साठी मंजूर करण्यात आली.
त्याचबरोबर करजगाव व इतर पाणी योजनांच्या दुरुस्तीसाठी ही निधी उपलब्ध करून दिल्याचे प्रतिपादन मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
यावेळी बोलताना मंत्री शंकरराव गडाख यांचे विषयी ते म्हणतात की शांत बसणारा माणूस पण कामासाठी नेहमी विचारपूस करून ती योजना अमलात आणण्यासाठी अतिशय मोलाची भूमिका घेणारे असे शंकरराव गडाख आहेत असे यावेळीना गुलाबराव पाटील यांनी सांगितले.