बालाजी देडगाव येथे श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन.

बालाजी देडगाव येथे श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन.

बालाजी देडगाव :- (प्रतिनिधी युनूस पठाण)नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे उद्या दिनांक २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे होत असलेल्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा व उद्घाटन सोहळा निमित्त अखंड हिंदुस्तानात हा सण साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने बालाजी देडगाव येथेही विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

           देडगाव चे वैभव गाथा मूर्ती ह भ प सुखदेव महाराज मुंगसे यांच्या अधिपत्याखाली श्रीराम मंदिर (महादेव मंदिर) येथे उद्या दुपारी १२ वाजता अभिषेक व महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. व सायंकाळी ५ ते ६ ह भ प सुखदेव महाराज मुंगसे यांचे जाहीर हरिकीर्तन होईल. त्यानंतर ७ ते ८ भव्य दिव्य शोभायात्रा व मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. व भव्य दिव्य दीप उत्सव व शोभेची दारू चे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे.

         तरी या होणाऱ्या उत्सवासाठी देडगाव परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. या कार्यक्रमासाठी बजरंग दल ,कैलासनाथ मित्र मंडळ , राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बालाजी भजनी मंडळ, गावातील सर्व धार्मिक मंडळ व ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थ हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मोलाचे कष्ट घेत आहेत.