आळेफाटा पोलिसांची कामगिरी. .! ! श्रीरामपूर च्या तीन महिला समवेत एका अट्टल गुन्हेगार आरोपीला अटक. .. !!!

आळेफाटा पोलिसांची कामगिरी. .! ! श्रीरामपूर च्या तीन महिला समवेत एका अट्टल गुन्हेगार आरोपीला अटक. .. !!!

अहमदनगर :: -
 अहमदनगर जिह्ल्यात असणाऱ्या श्रीरामपूर तालुक्यां मधील तीन महिलांसह त्यांच्या एका अट्टल गुन्हेगार असणाऱ्या  साथीदाराला आळेफाटा येथील पोलिसांनी पाठलाग करून शिफारतीने अटक केली आहे. सदरील महिलांचा गुन्हा बघता अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि अनेकांना धक्काच बसला आहे. आळेफाटा या ठिकाणच्या बसस्थानकांत नेहमी गर्दी असते कारण या ठिकाणी पुणे ,मुंबई ,अहमदनगर, संगमनेर ,नाशिक ,या ठिकाणा वरून गाड्याचा ओघ चालू असतो यांतच गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या अंगावरील मौल्यवान दागिने हातचलाखी करुन या महिला चोरी करीत होत्या.या प्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल होवू लागल्याने या हद्दीतील पोलिसांनी या परिसरात नजर ठेवली असता या महिलाचोर उघडकीला आल्या असता त्यांना अटक केली असता त्यांनी आळेफाटा या हद्दीतील आठ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी अटक केलेल्या महिलांची नावे नंदा संजय सकट (वय - 35), परीघा नाना राखपसरे (वय - 60), शोभा प्रताप खंदारे (वय - 55), संजय भानुदास सकट (वय -46 ) सर्व राहणार- इंदिरानगर ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर अशी आरोपींची नावे आहेत.
     याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.मंदार जवळे यांनी दिलेली माहिती अशी की, आळेफाटा बस स्थानक परिसरात दिनांक  18 एप्रिल 2022 रोजी बसमध्ये चढत असताना प्रवाशी महिलेच्या पर्समध्ये असलेले 50 हजार रूपये रोख रक्कम व 14 तोळे 6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असे एकूण 7 लाख 50 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. पोलीस निरीक्षक श्री.प्रमोद क्षीरसागर यांनी तपासा करिता एका पथकाची नेमणूक केली होती .आपले गाव आपली निगराणी या मोहिमेंतर्गत सुमारे 400 सीसीटीव्ही कॅमेरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत बसवण्यात आले असून पथकाने बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पहाणी केली असता MH -17 V 391या  इंडीका कार मधील तिन महिला व एक पुरूष यांच्या हालचाली संशयास्पद दिसून आल्या. पथकाने श्रीरामपूर जि. अहमदनगर येथे वेशांतर करून 18 एप्रिल ते 19 मे असे तब्बल एक महिनाभर या  इंडिकाकार असणाऱ्या मालकाची व गाडीची सर्व माहीती मिळवली. तांत्रिक विश्लेषणवर हे आरोपी राहात असलेल्या येणार्‍या जाणार्‍या रोडवर पोलिसांनी  बारकाइने लक्ष ठेवले.दरम्यान आरोपी 19 मे 2022 रोजी गणेश चतुर्थी असल्याने राजुर जिल्हा जालना या ठिकाणी गणपती मंदिर परिसरात चोरी करण्यासाठी जात असल्याची गोपनीय माहीती पोलीस निरीक्षक श्री.प्रमोद क्षीरसागर यांना मिळाली. आरोपी कारमध्ये इंदिरानगर श्रीरामपूर येथुन निघाले असता साध्या वेशात असलेले पोलीस हवालदार श्री.विनोद गायकवाड, पोलीस हवालदार श्री.अमित माळुंजे यांनी कारचा पाठलाग केला.त्यांच्या मदतीला आळेफाटा येथून नेमलेले पथक देखील रवाना झाले.या इंडिका कारचा 125 किलोमीटर पाठलाग करत औरंगाबाद जिल्ह़्यातील वाळुंज येथे त्यांना ताब्यात घेण्यात आले असता त्या गाडीतून महिला आरोपी नंदा संजय सकट (वय- 35), परीघा नाना राखपसरे (वय- 60), शोभा प्रताप खंदारे (वय -55), संजय भानुदास सकट (वय -46 ) सर्व राहणार इंदिरानगर ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर अशी त्यांनी त्यांची नावे सांगितली. उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, उपनिरीक्षक रागीणी कराळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रा डुंबरे, विनोद गायकवाड, लहानु बांगर, भिमा लोंढे, प्रकाश जढर, अमीत माळुंजे, हनुमंत ठोबळे, मोहन आनंदगावकर, होमगार्ड प्रतिक जोरी, पोलीस मित्र संदीप गडगे, विजय ताजणे यांच्या पथकाने हि कामगिरी केली. या आरोपींना आळेफाटा पोलीस ठाण्यात आणून त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बस्थानक परिसरात केलेल्या सहा चोर्‍या, एक घरफोडी, एक जबरी चोरी असे आठ गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपीकडून 24 तोळे सोने, 15 तोळे चांदी, एक कार असा 17 लाख 58 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्याकडील चोरीचे सोने विकत घेणार्‍या विकास सुरेश कपिले (वय -34 )रा. सलबतपुर ता. नेवासा जि. अहमदनगर), जगदीश गजानन देवळालीकर (वय- 40 ) रा.रामचंद्र कुंज अहमदनगर शहर या सराफाला अटक केली आहे.घटनेचा पुढील तपासांत या महिलां कडून अजून कोणत्या ठिकाणी गुन्हे केले आहेत , किती प्रकारची लूट केलेली आहे. कोणत्या शहरांत चोऱ्या केलेल्या आहेत अशी सर्व माहिती घेण्यात येत आहे.घटनेचा पुढील तपास अधिकारी वर्ग व पोलीस करीत आहेत.