डी पॉल इंग्लिश मीडियम हायस्कूल आगाशेनगर, मध्ये सुरू होत असलेल्या 'सांस्कृतिक सप्ताह २०२४ -२५' ची सुरुवात खूपच जल्लोषाने करण्यात आली.
श्रीरामपूर:- ( आगाशेनगर) प्रत्येक शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्व विकसित करण्यासाठी शाळा विविध उपक्रम शाळेत राबवत असते त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक २१ ऑगस्ट २०२४ डी पॉल इंग्लिश मीडियम हायस्कूल मध्ये सुरू होत असलेल्या 'सांस्कृतिक सप्ताह' ची सुरुवात खूपच जल्लोषाने करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात सौ. रेणुका राऊत यांनी प्रास्ताविक करून केले. लहान मुलांनी नृत्याच्या माध्यमातून प्रार्थना गीताचे सादरीकरण केले. कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुण्या प्रियंका जन्वेजा मॅडम,शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर सेलिंग, रेव्ह. फादर शीजो, रेव्ह. फादर फ्रेंको आदींचा सत्कार सौ. सोनाली झांजरी यांनी केला.प्रमुख पाहुण्या, शाळेच्या मुख्याध्यापिका, फादर, सिस्टर ब्लेसा, मॉली कुथुर, श्री. रवि लोंढे आदींच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख पाहुण्या तसेच आदरणीय रेव्ह. फादर शीजो यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमात श्री. गणेश पवार, श्री. विकास वाघमारे, सौ. सुनयना भालेराव, सौ. नंदा पवार, डॉ. गुरुदिपीकौर गुंडू, श्री. सुनील बोरगे मामा, सौ. मंदा पारधे मावशी यांचे विशेष सहकार्य लाभले. शाळेतील इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व शाळेतील विद्यार्थ्यांचा बहुमोल वाटा होता. श्रीमती.मालन मोहन यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.