ठराविक वेळेत पाणी पुरवठा न केल्यामुळे सावनेर स्थित माताखेडी परिसरातील महिला त्रस्त .
ठराविक वेळेत पाणी पुरवठा न केल्यामुळे सावनेर स्थित माताखेडी परिसरातील महिला त्रस्त .
______________________________________________
सावनेर : (दि.10 ऑगस्ट) शहरातील नगरपालिका द्वारे स्थानीय नागरिकांसाठी नियमित पाणीपुरवठा करण्यात यावे जेणेकरून नागरिकांना गैरसोय नाही व्हावी , याकरिता नगरपालिकाद्वारे कंत्राटपद्धतीनुसार पाणी पुरवठाचा नियोजन करण्यात आलेलं आहे . पण गेल्या मागील वर्षापासून माताखेडी येथील टिब्बा परिसर येथे रहिवाशियांना एक दिवसाचा आड फक्त 1 तास पाणी पुरवठा करण्यात येत आहे . त्यावर नपा अधिकारी यांचे कंत्राटदारांवर कोणतेही वचक नसल्यामुळे कंत्राटदार मनमर्जी कामे करीत असल्याचा ठपका सावनेर नगरपालिकेवर लागला आहे .
शहरातील माताखेडी स्थित टिब्बा परिसर भागात पाण्याची टंचाईमुळे तेथील रहिवासी यांना होणारा त्रासाबद्दल मागील वर्षी आम आदमी पक्षाच्या वतीने दखल घेऊन आंदोलन करण्यात आले . तसेच नपा अधिकारी यांच्या सोबत बैठक घेऊन अतितातडीने नवीन पाईप लाईन बसविण्यात आली होती. जेणेकरून नपा पाणी पुरवठाा विभाग द्वारे परिसरात 1 दिवसाचे आड फक्त 1 तास पाणी पुरवठा करण्यात येत आहे . पण कंत्राटदारद्वारे ठराविक वेळेवर पाणी पुरवठा न केल्यामुळे व कंत्राटदार स्वतःचा मनमर्जीने कार्य करीत असल्याने माताखेडी स्थित टिब्बा परिसरातील स्थानिक महिलांना त्रास भोगावे लागत आहे . पाणीपुरवठा करणारा कंत्राटदारला स्थानीय नागरिक यांनी विचारणा केली असता कंत्राटदार नेहमी कधी इलेक्ट्रिक नसल्याबाबत तर कधी मोटर जळल्यामुळे व पाण्याची टाकी भराची आहे अशाप्रकारे उडवाउडवीची उत्तरे सांगून तसेच दिलेल्या वेळेवर पाणी पुरवठा करीत नाही . यामुळे विनाकारण स्थानीय महिलांना नेहमी मानसिक त्रास होत असतो . नपा पाणी पुरवठा विभाग द्वारे सदर परिसरात पिण्याचे पाण्याची पुरवठा करणारा कंत्राटदाराचे कोणतेही अचूक वेळ ठरविले नसून पाणीपुरवठा विभागाचे अजिबात याकडे लक्ष नाही . अशी चर्चा परिसरात व नागरिकांमध्ये सुरू आहे .परिसरातील असंख्य लोक गोर-गरीब आणि हात मजुरीकाम करीत असल्याने त्यांचे घरी पाणी साठवण्याची कोणतेही सोय नाही . त्यामुळे दररोज अचूक वेळेवर नियमित पाणी पुरवठा होणे गरजेचे आहे की नाही , अशा जाब येथील रहिवाशीयांनी शासनाला केलेली आहे तसेच अशा गंभीर विषयाचा तोडगा न निघाल्यास स्थानिक रहिवाशीयांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे . स्वतःला सावनेर नपा पाणी पुरवठा विभागाच्या बगलबच्चा समजणारा कंत्राटदार विकास डोंगरे यांची अशा हलगर्जी कार्याप्रणालीमुळे परिसरातील राहणारे रहिवाशीयांना होणारा त्रासाबद्दल सदर कंत्राटदारांवर नगरपालिका प्रशासन काय कार्यवाही करेल याकडे सर्व नागरिकांचे लक्ष वेधले आहे .