अहिल्याबाई होळकर शाळेमध्ये गुरूंचा सन्मान करत गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी.

अहिल्याबाई होळकर शाळेमध्ये गुरूंचा सन्मान करत गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी.

बालाजी देडगाव:-

( प्रतिनिधी युनूस पठाण)नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या शाळेमध्ये नेहमीच संस्काराचे धडे दिले जातात .शिक्षणाबरोबर अनेक विविध उपक्रमही साजरे केले जातात . गुणवंत विद्यार्थ्यांचा नेहमी सन्मान केला जातो.कारण विद्यार्थी जीवनामध्ये यशस्वीरित्या घडून समाजाचा मोठा घटक बनवा. यासाठी ही शाळा नेहमी विविध क्षेत्रांमध्ये अग्रेसर असते व मुलांच्या गुणांची पारख करून त्यांना त्यांच्या आवडी निवडी नुसार संधी देत असते. म्हणून देडगाव परिसरातून या शाळेचे नेहमीच कौतुक होत असते.

     या कार्यक्रम प्रसंगी गाथा मूर्ती ह .भ. प .सुखदेव महाराज मुंगसे अध्यक्षस्थानी लाभले . तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानदेव कदम सर यांनी केले. तर गुरुपौर्णिमा निमित्त देडगावचं वैभव गुरुवर्य सुखदेव महाराज मुंगसे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

             यावेळी पत्रकार युनूस पठाण, ज्ञानेश्वरी गोयकर ,काजल देवकाते ,चेतना पगारे ,ज्ञानेश्वरी वैरागर, पूजा खरात ,आदीनी आपले मनोगत व्यक्त करत गुरु विषयी अनमोल माहिती दिली.

         यावेळी ह भ प गाथामूर्ती सुखदेव महाराज मुंगसे बोलताना म्हणाले की ,गुरु हा जीवनातील महत्त्वपूर्ण घटक असून सद्गुरु शिवाय जीवनात यश प्राप्ती नाही. म्हणून गुरूंचा नेहमी सन्मान करावा. आपल्या जीवनात त्यांना मोलाचे स्थान द्यावे . "पैसो से सब कुछ मिलता है लेकिन गुरु का ज्ञान नही मिलता "असे अनमोल मार्गदर्शन यावेळी केले.

       या कार्यक्रमास अहिल्याबाई होळकर शाळेचे मुख्याध्यापक स्वरूपचंद गायकवाड सर,पर्यवेक्षक चामुटे सर ,व सर्व शिक्षक वृंद, गुरुजन वर्ग,विद्यार्थी, विद्यार्थिनी व आदी मान्यवर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी कुटे हिने केले तर आभार वैष्णवी मुंगसे यांनी मानले.